बीड, 29 नोव्हेंबर : आपण मोकाट जनावर रस्त्यावर फिरताना अनेकवेळा पाहिले असतील. पण बीड (Beed) शहरातील शाहूनगर भागात ऐन चौकात दोन रेड्यांमध्ये (Bulls) चांगलीच जुंपली. त्यांच्यात तब्बल 1 तास लढाई सुरु होती. त्यामुळे वाहतूक तर ठप्प झालीच, पण धावाधावा आणि पळापळाच्या हाकेने बघ्यांचीही धांदल उडाली. अखेर दोन्ही रेड्यांच्या पायाला दोर बांधून त्यांना दोन वेगवेगळ्या दिशेला नेले तेव्हा कुठे हा संघर्ष (Clash) थांबला. संबंधित घटना ही आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात मोकाट जनावरांची असलेली दहशत उघड झाली आहे.
संबंधित घटनेमुळे काहीकाळ रस्त्यावर गोंधळ उडाला. दोन रेड्यांच्या संघर्षात रस्त्यावर उभ्या असलेल्या काही गाड्यांचेदेखील नुकसान झाले. झुंजीदरम्यान शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस तिथे पोहोचले. एरवी भांडणात दोन्ही गटांना शांत करणारे पोलीस रेड्यांच्या टकरीत काहीच करु शकले नाहीत. दोन्ही रेड्यांचे आक्रमक रुप पाहून पोलिसांनी जमावाला मागे सरकरण्याचा सल्ला देत तिथून निघून जाणेच पसंत केले.
हेही वाचा : मृत्यूनंतर महिलेला दुसरा डोस, आरोग्य यंत्रणेकडून मृतकाच्या कुटुबियांची थट्टा?
बीड शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागे ऐन चौकात खासगी व्यक्तींच्या मालकीच्या दोन रेड्यांमध्ये समोरासमोर टक्कर झाल्याचं बघायला मिळालं. प्रत्यक्षदर्शींच्या मते त्यांनी एकमेकांकडे रोखून पाहिले, नंतर धावतच समोरासमोर आले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना शिंगाने मारुन त्यांच्या लढाईला सुरु झाली. दोन्ही रेड्यांची शिंगे एकमेकांत अडकल्याने त्यांच्या शरीराचा तोल जात होता. मात्र, हा तोल सांभाळत त्यांची झुंज सुरु होती. पाहता-पाहता ते अधिक आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहने खोळंबली. भररस्त्यात त्यांची ही झुंज सुरु असल्याने बघ्यांची गर्दीही वाढली. कधी रस्त्याच्या या बाजूला तर कधी त्या बाजूला असा त्यांचा मुक्त 'धिंगाणा' सुरु होता. तब्बल अर्धा तास हा सगळा प्रकार सुरु होता. त्यामुळे पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना रस्त्यात अडकून पडावे लागले.
बीड शहरात मोकाट जनावरांचा भर चौकात धुडगुस, तब्बल तास भर टक्करीचा विडिओ व्हायरल pic.twitter.com/M2qsjK8sp5
— News18Lokmat (@News18lokmat) November 29, 2021
हेही वाचा : तरुणाने परत केला 5 लाखांचा हुंडा; म्हणाला, कर्तृत्वावर ठेवा विश्वास !
रेड्यांच्या झुंजीदरम्यान धक्का लागून ओळीने उभ्या केलेल्या तीन दुचाकी पडल्या. त्यानंतर एक रेडा नालीत कोसळला. मात्र, त्याने वर येऊन समोरच्या रेड्यावर शिंगाने हल्ला केला. काही व्यापाऱ्यांनी भीतीने दुकाने बंद केली. दोन्ही रेडे एकमेकांवर चवताळून पडत. शिंगे लागल्याने ते जखमी झाले आणि रक्त निघू लागले. काठीने मारुन, शेपटी पिरगळून रेड्यांवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न असफल झाल्याने अखेर दोन्ही रेड्यांच्या पायांना दोरीने बांधून त्यांना एकमेकांपासून वेगळे केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.