जयपूर, 29 ऑक्टोबर: सासरची मंडळी लग्नात देत असलेला 5 लाख रुपयांचा हुंडा नाकारून (Youth returned dowry amount of 5 lakh given during marriage ceremony) तरुणाने जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. हुंडा घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र आजही अनेक भागात हुंडा घेणं (Dowry relation with respect) हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. ज्याची नोकरी जेवढी जास्त पगाराची, तेवढा त्याला मिळणारा हुंडा अधिक, असं समीकरण समाजात अनेक ठिकाणी दिसतं. मात्र अनेक तरुण ही अघोरी प्रथा बंद करण्यासाठी (Youth setting examples) पावलं उचलताना दिसत असून एका तरुणाने दिलेला हुंडा काही वेळातच परत करण्याचा निर्णय घेत त्याची प्रचिती दिली आहे.
भेट दिली परत
राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात देवेद्र शेखावत या तरुणाचं लग्न सोनू कंवर नावाच्या तरुणीसोबत झालं. यावेळी लग्नादरम्यानच्या एका कार्यक्रमात सासरच्या मंडळींकडून वराला 5 लाख रुपयांची भेट देण्यात आली. मात्र हुंड्याच्या स्वरुपात देण्यात येणारे हे पैसे घेण्यास नवरदेव देवेंद्रने नकार दिला. नवरदेवाच्या या निर्णयामुळे अनेकांना सुखद धक्का बसला. अनेकांना तर नवरदेवाने हुंडा नाकारला, यावर विश्वासच बसला नाही.
स्वकर्तृत्वावर आहे विश्वास
आपला स्वकर्तृत्वावर विश्वास असून स्वतःला विकण्याची इच्छा नसल्याचं देवेंद्रनं सासरच्या मंडळींना सांगितलं. हुंडा ही अघोरी प्रथा असून जोपर्यंत स्वतःपासून हुंडा नाकारण्याची सुरुवात होत नाही, तोपर्यंत ही प्रथा बंद होणार नाही. त्यामुळे स्वतःपासूनच सुरुवात करण्याचा निर्णय़ आपण घेतला असून इतरांनादेखील आपण हुंडा नाकारण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
हे वाचा - RT-PCR टेस्टनं ओळखता येऊ शकते ओमिक्रॉन व्हेरिएंट?, WHO नं दिलं उत्तर
बदलतोय समाजाचा ट्रेंड
स्वतःला विकण्याचा आणि नवरा विकत घेण्याचा ट्रेंड बदलत असून आता तरुण हुंड्याच्या प्रथेला विरोध करत असल्याचं चित्र दिसत आहे. राजस्थानमध्येच एका तरुणीनं हुंड्याच्या प्रथेवर अनोखं उत्तर शोधल्याची घटना नुकतीच समोर आली होती. हुंड्यात जितके पैसे देणार आहात, त्या पैशात मुलींसाठी हॉस्टेल बांधा अशी मागणी तिने आपल्या आईवडिलांकडे केली होती. हळूहळू समाजाची पावलं आधुनिक विचारांच्या दिशेनं पडत असल्याचं हे लक्षण मानलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Marriage