मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लव्ह जिहादविरोधी कायद्याची गरज, ...त्यांना संरक्षण मिळायला हवं, चित्रा वाघ यांची मागणी

लव्ह जिहादविरोधी कायद्याची गरज, ...त्यांना संरक्षण मिळायला हवं, चित्रा वाघ यांची मागणी

महाराष्ट्रातसुद्धा उत्तर प्रदेश सारखाच लव्ह जिहादविरोधी कायदा करणं गरजेचं असल्याचं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रातसुद्धा उत्तर प्रदेश सारखाच लव्ह जिहादविरोधी कायदा करणं गरजेचं असल्याचं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्रातसुद्धा उत्तर प्रदेश सारखाच लव्ह जिहादविरोधी कायदा करणं गरजेचं असल्याचं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : महाराष्ट्रातही  उत्तर प्रदेश सारख्या लव्ह जिहादविरोधी कायद्याची गरज आहे, असं चित्र वाघ यांनी म्हटलं आहे. श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, श्रद्धा वालकरची घटना  अंगावर काटा आणणारी आहे, यातून तरुण पिढीने धडा घेतला पाहिजे. हिंगोलीत घडलेल्या  घटनेसारख्या घटना महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहेत. जबरदस्तीने धर्मांतरण करणे, फूस लावून पळवून नेणं अशा केसेसमध्ये त्या मुलींना त्या कुटुंबाला संरक्षण देणं गरजेचं असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

कायद्याची गरज  

दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्रातसुद्धा उत्तर प्रदेश सारखाच लव्ह जिहादविरोधी कायदा करणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे.  अशा घटनातून तरुण पिढीने बोध घ्यावा. तसेच अशा केसेसमध्ये अडकलेल्या त्या मुलींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची गरज असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  धक्कादायक! आधी लग्नाचे आमिष नंतर अत्याचार, धर्मांतरासाठी तरुणीवर दबाव टाकणाऱ्या आरोपीला बेड्या

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

दुसरीकडे  श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकाने 18 ऑक्टोबर रोजी महरौली येथील आरोपी आफताब अमीन पूनावालाच्या भाड्याच्या घराजवळ बसवलेल्या सीसीटीव्हीचे काही फुटेज जप्त केले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आफताब हातात काही सामान घेऊन तीनदा घरातून बाहेर पडताना दिसत आहे.

हेही वाचा :  कोल्हापूर : मुलींचे शाळेत जाणे झाले अचानक बंद, चौकशीतून हादरवणारी माहिती समोर, पालकांचा संताप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याच्याकडे याबाबत विचारपूस केली असता आफताबने सांगितलं की, 18 ऑक्टोबर रोजी फ्रीजमध्ये ठेवलेल्या श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे त्याने फेकले होते. आफताबने पोलिसांसमोर दिलेल्या जबानीनुसार, श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले. मृतदेहाचे तुकडे हळूहळू काळ्या पॉलिथिनमध्ये टाकून तो जंगलात फेकून देत असे.

First published:

Tags: BJP, Chitra wagh, Uttar pradesh, महाराष्ट्र