पुणे/नागपूर, 13 मार्च : विदर्भात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. नागपुरातील गेल्या 24 तासांची कोरोनाची आकडेवारी ही चिंता वाढवणारी आहे. याशिवाय गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासातील कोरोनाची रुग्णसंख्या पाहता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने कडक निर्बंध लावले असतानाही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत नागपुरात 2261 नवीन रुग्ण आढळून आले असून 07 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात दिवसभरात 1805 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. (more then 2000 corona patients in Nagpur on the same day despite restrictions; Havoc in Pune too) वाढणारी गर्दी, कोरोना नियमांचं उल्लंघन होत असल्याने परिणामी पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू केला आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांत निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.
हे ही वाचा-देशात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण पुण्यात; कडक निर्बंधांनंतर धक्कादायक आकडेवारी समोर
नागपुरात कोरोना रुग्णाच्या संख्येने आज दोन हजारचा आकडा पार केला असून मागील 24 तासात येथे 2261 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर ०7 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या नागपुरात अॅक्टिव्ह केसेसचा आकडा 15 हजार 467 च्या घरात गेला आहे. दुसरीकडे पुण्याबद्दल सांगावयाचे झाल्यास येथे दिवसभरात 1805 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून दिवसभरात 598 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात कोरोनाबाधीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी ०5 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. 341 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 214830 इतकी असून ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 9740 आहे. देशात सर्वात जास्त ॲक्टिव्ह केसेस सर्वाधिक जिल्हे महाराष्ट्रातच आहेत. त्यात पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यातील अॅक्टिव्ह आणि नव्या रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona updates, Nagpur, Pune