मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुर्मूंना पाठींबा दिल्याने काँग्रेसला धक्का? पाठिंब्यापूर्वी साधी चर्चाही नाही तर.. थोरातांच्या ट्विटने वेधलं लक्ष

मुर्मूंना पाठींबा दिल्याने काँग्रेसला धक्का? पाठिंब्यापूर्वी साधी चर्चाही नाही तर.. थोरातांच्या ट्विटने वेधलं लक्ष

indian presidential election 2022 : शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावर महाविकास आघाडातील घटकपक्ष नाराज झाला आहे.

indian presidential election 2022 : शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावर महाविकास आघाडातील घटकपक्ष नाराज झाला आहे.

indian presidential election 2022 : शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यावर महाविकास आघाडातील घटकपक्ष नाराज झाला आहे.

  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 12 जुलै : काही दिवसांपासून तळ्यातमळ्यात सुरू असलेल्या शिवसेनेने अखेर एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (nda candidate draupadi murmu) यांना पाठींबा जाहीर केला आहे. पाठींबा जाहीर करताना आमच्यावर कोणताही दबाव नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, या निर्णयानंतर महाविकासआघाडीतील घटक पक्ष काँग्रेस नाराज झाला आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, अशी खंत काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. गैरलोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे, असं मतही थोरातांनी व्यक्त केलं.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही.जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार? असं थोरात म्हणाले.

शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, असंही थोरातांनी स्पष्ट केलं.

राजकारणातील मोठी बातमी; भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार दौपद्री मुर्मू यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा

राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. तशी घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आत्ता महाराष्ट्रात चाललेलं राजकारण पाहता मी पाठिंब्यासाठी विरोध करायला हवा होता. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. आताही शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असा सांगतानाच मी कोत्या मनाचा नाही. आदिवासी समाजाच्या अनेक नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचे फोन आल्यानंतर प्रेमाच्या आग्रहाखातर आम्ही मूर्मू यांना पाठिबा देण्याचा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

First published:

Tags: Balasaheb thorat, Shivsena