मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुलाच्या शिंदे गट प्रवेशावर सुभाष देसाईंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाले त्याचं राजकीय अस्तित्व...

मुलाच्या शिंदे गट प्रवेशावर सुभाष देसाईंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया; म्हणाले त्याचं राजकीय अस्तित्व...

मुलाच्या शिंदे गट प्रवेशावर देसाईंची पहिली प्रतिक्रिया

मुलाच्या शिंदे गट प्रवेशावर देसाईंची पहिली प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वीच सुभाष देसाई यांच्या मुलाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर देसाई यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

छत्रपती संभाजीनगर, 2 एप्रिल : आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा आहे. या सभेला महाविकास आघाडीमधील जवळपास सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र दुसरीकडे त्याचवेळी शिंदे, फडणवीस सरकारकडून सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी उद्धव ठाकरेंना सावरकर गौरव याञेचं निमंत्रण देण्याच्या भानगडीत पडू नये, असा टोला यावेळी सुभाष देसाईंनी लगावला आहे.

मुलाच्या शिंदे गट प्रवेशावर प्रतिक्रिया   

दरम्यान काही दिवसांपूर्वीच सुभाष देसाई यांच्या मुलाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर देखील देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेंनी माझ्या मुलाला फोडल्याने मला काहीही फरक पडत नाही, त्याचं काहीही राजकीय अस्तित्व नाही, असं देसाई यांनी म्हटलं आहे. मुलगा शिंदे गटत गेल्यानंतर पहिल्यांदाच देसाई यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.

 आज संभाजीनगरमध्ये मविआची सभा

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा होणार आहे.  या सभेला महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आज या सभेला उपस्थित राहणार असल्यानं या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे.

First published:
top videos

    Tags: Eknath Shinde, Shiv sena, Subhash desai, Uddhav Thackeray