मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /राऊतांवर टीका करताना संजय शिरसाटांची जीभ घसरली, नको ते बोलून बसले म्हणाले...

राऊतांवर टीका करताना संजय शिरसाटांची जीभ घसरली, नको ते बोलून बसले म्हणाले...

राऊतांवर टीका करताना शिरसाटांची जीभ घसरली

राऊतांवर टीका करताना शिरसाटांची जीभ घसरली

संजय राऊतांवर टीका करताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली आहे. त्यांनी राऊतांवर वादग्रस्त टीका केल्याचं समोर आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

छत्रपती संभाजीनगर, 27 मार्च, अविनाश कानडजे : रविवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसेप्रमुख राजे ठाकरे यांना भेटले यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र संजय राऊत यांच्यावर टीका करत असताना शिरसाट यांची जीभ घसरली.

नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट? 

संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री राज ठाकरे यांना भेटले त्यात वाईट काय आहे. शिंदे एका ठाकरेला भेटले म्हणून दुसरे ठाकरे नाराज का होतात? राज ठाकरे यांच्याकडे व्हिजन आहे, एखाद्या व्यक्तीचा चांगला गुण घेतला तर वाईट काय आहे? दुसऱ्याला भेटल्यानंतर यांच्या पोटात पोटसूळ उठतो असा घणाघात शिरसाट यांनी केला आहे.

शिरसाटांची जीभ घसरली 

पुढे बोलताना ते म्हणाले की,  मी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंकडे भेटण्यासाठी घेऊन जातो. त्यांची भेटण्याची तयारी आहे का? राज ठाकरे तुमच्यासारखे नाहीत, सकाळी उठायचं आणि कुत्र्यासारखं भो-भो भुंकायचं. राज ठाकरे एकदाच बोलतात पण सगळ्यांची हवा टाईट होऊन जाते. संजय राऊत मूर्खांच्या नंदनवनात वावरणारे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. आता संजय शिरसाट यांच्या टीकेला राऊत काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Raj Thackeray, Sanjay raut