परभणी, 25 मार्च, विशाल माने : परभणीमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. संजय जाधव हे परभणीचे खासदार आहेत. संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या बातमीनं खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना या आगोदर देखील एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एक वर्षापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
गडकरींना धमकी
राजकीय नेत्यांना धमकी देण्याच्या घटना सुरूच आहेत. संजय जाधव यांच्यापूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांना देखील धमकी देण्यात आली आहे. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारू अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नितीन गडकरी यांना त्यापूर्वी देखील एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दोन्ही वेळेस नितीन गडकरी यांना जयेश पुजारी या व्यक्तीच्या नावाने धमक्या आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shiv sena