इम्तियाज अहमद, प्रतिनिधी मुक्ताईनगर/जळगाव : उकाडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कुलरची मागणी वाढली आहे. घरात कुलर सध्या 24 तास कुलर चालू असतात. त्याच दरम्यान लहान मुलं असतील तर तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या. ती खूप जास्त उपदव्यापी असतात. लहान मुलांना सर्वात जास्त कुतूहल असतं आणि काहीवेळा तेच त्यांचा जीवावर बेतू शकतं. चिमुकलीला कुलरचा शॉक लागल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ९ वा वाढदिवस असल्याने सर्व कुटुंबीय मुलीचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करत होते.
या चिमुकलीला कुलरचा जबरजस्त शॉक बसल्याने मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना जळगावच्या मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रं.१२ मधील जिजाऊ नगरमध्ये घडली. वैष्णवी चेतन सनान्से, हिचे कुलरचा शॉक लागुन दुर्दैवी मृत्यू झाला, या दुर्दैवी घटनांमुळे मुक्ताईनगर शहरात हळहळ व्यक्त होत आहे .
Viral video : दोन वृद्धांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; कारण वाचून हसू आवरणार नाही!तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांची काळजी घ्या. त्यांना अशा इलेक्ट्रॉनिकच्या उपकरांना हात लावू देऊ नका. बऱ्याचदा ते कुलरच्या जाळीमध्ये किंवा पंख्यात बोट घालण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी त्यांना डोळ्यात तेल घालून जपणं आवश्यक आहे. उकाडा प्रचंड वाढला आहे. पुढचे तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. वाढणाऱ्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे दिवसभर पंखा, एसी, कूलर चालू ठेवला जातो. अशावेळी लहान मुलं त्याच्या आजूबाजूला नसतील याची काळजी घ्या, नाहीतर अशा दुर्घटना घडू शकतात.