छत्रपती संभाजीनगर, 20 मे : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटरसायकलचा धक्का लागल्यानं दोन वृद्ध व्यक्तींमध्ये सुरुवातीला वाद झाला. या वादाच रुपातंर नंतर फ्री स्टाईल हाणामारीत झालं. या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन वृद्ध व्यक्ती बाईकवरून जात होते. मात्र याचदरम्यान त्यांचा एकोंमेकांना धक्का लागला. धक्का लागल्यानं त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दोघांचं वय लक्षात घेता एवढा राग त्यांना का आला असेल? अशी विनोदी चर्चा शहरात सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगरात दोन वृद्धांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. pic.twitter.com/n4K8rDeqjU
— News18Lokmat (@News18lokmat) May 20, 2023
व्हिडीओमध्ये नेमकं काय? या व्हिडीओमध्ये दोन वृद्ध व्यक्ती आपसात चांगल्याच भीडल्या आहेत. धक्का लागल्याच्या कारणातून त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर फ्री स्टाईल हाणामारीत झालं. हा व्हिडीओ शहरातील नेमका कुठल्या भागातील आहे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये.