संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेचा पारा चांगलाच चढला आहे. कल्याण डोंबिवली परिसरातही उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत.
घराबाहेर पडताना सर्वांनी काळजी घ्यावी असे निर्देश हवामान खात्याने दिले आहेत. अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे टोपी, स्कार्फ वापरण्याची गरज आहे.
काल 19 मे रोजी कल्याण - डोंबिवलीत कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस होते.
आज शनिवारी देखील तापमान अधिक असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 20 मे रोजी सकाळी कमाल तापमान 38 तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.