धक्कादायक! होम क्वारंटाईन न राहता फिरले शहरभर, 4 कोरोनाबाधित रुग्णांवर गुन्हा

धक्कादायक! होम क्वारंटाईन न राहता फिरले शहरभर, 4 कोरोनाबाधित रुग्णांवर गुन्हा

होम क्वारंटाईनचे आदेश झुगारून बाहेर फिरणे आठ जणांना चांगलंच महागात पडलं आहे.

  • Share this:

बीड, 14 जून: होम क्वारंटाईनचे आदेश झुगारून बाहेर फिरणे आठ जणांना चांगलंच महागात पडलं आहे. बीड शहर पोलिलांना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर गुन्हा दाखल होण्याची बीड जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.

हेही वाचा...कोविड हॉस्पिटलमध्ये शिरलं पूराचं पाणी, समोर आला अंगावर काटा उभा करणारा VIDEO

बीडकरांचं टेन्शन वाढलं...

आरोपींनी दुसऱ्याच्या आरोग्यावर बाधा येईल असं कृत्य केलं म्हणून बीड शहरातील मसरत नगरमधील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 4 जण हे कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आरोपीना होम क्वारंटाईन व्हायला सांगण्यात आलं होतं. मात्र, होम क्वारंटाईन न राहता ते शहरभर फिरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता बीड शहरातील नागरिकांचं टेन्शन वाढलं आहे. धक्कादायक म्हणजे यातील काही जणांनी एका एका लग्न सोहळ्याला देखील हजेरी लावली होती. यामुळे लग्नाच्या आयोजकांसह इतर 50 जणांवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बीड शहरातील मसरत नगरमधील चौघे हैदराबाद येथे जाऊन आले होते. तिघांना जिल्हाधिकारी यांनी होम कॉरंटाईन होण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते बँक, रजिस्ट्री कार्यालयासह एका लग्नालाही उपस्थित राहिल्याचं समोर आलं आहे. ही कृती म्हणजे दुसऱ्यांच्या आरोग्यास हानिकारक आहे. होम कॉरंटाईन न राहता बाहेर फिरुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन आणि साथ रोग कायद्यानुसार लग्न आयोजकासह इतर 50 जणांवर देखील बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा... कारमध्ये असं काय सापडलं की, 'बाहुबली' फेम अभिनेत्रीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

First published: June 14, 2020, 1:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading