हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अजितदादांचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन, म्हणाले...

हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अजितदादांचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन, म्हणाले...

'माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की..'

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे (national congress party) नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे अजित पवारांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (breach candy hospital) दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर अजितदादांनी सर्व कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे.

अजित पवारांनी ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.  'माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे, असं अजितदादांनी सांगितलं.

तसंच, 'राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन' असंही अजित पवार म्हणाले.

मागील आठवड्यात अजित पवार यांना अचानक ताप आणि थंडी भरून आली. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे  अजित पवार यांना योग्य ती खबरदारी घेतली. पण, सुरुवातील कोरोनाची चाचणी केली तेव्हा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला होता. पण, खबरदारीचा उपाय म्हणून 22 ऑक्टोबरपासून अजितदादांनी स्वत: ला क्वारंटाइन केले होते.

खबरदारी म्हणून दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या छातीचा सीटी स्कॅनही करण्यात आला होता. पण, रिपोर्ट हा नॉर्मल आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

एअरपोर्टवर सापडला नवजात बाळाचा मृतदेह, महिला प्रवाशांचे कपडे काढून केली तपासणी

कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे खबरदारी म्हणून अजितदादांनी स्वत: होम क्वारंटाउन होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते.  राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यक्रमांना अजितदादा हे अनुउपस्थिती होते. काही कार्यक्रमांना त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली होती. अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मात्र ही निव्वळ अफवा असल्याचे सांगून वृत्त फेटाळले होते. पण, आता दुसऱ्यांचा कोरोनाची चाचणी केली असता अजितदादांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

Published by: sachin Salve
First published: October 26, 2020, 12:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या