नाशिक, 30 सप्टेंबर : महाविकास आघाडीत एकत्र असताना शिवसेना आमदाराकडून (Chagan Bhujbal responds to allegation by Shivsena MLA Kande) आपल्यावर होणारे वैयक्तिक आरोप योग्य नसल्याचा पलटवार नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. कांदे यांना आपण सहकार्य करणार असून यापुढे आपल्यासाठी हा विषय (Issue closed for me says Bhujbal) संपल्यात जमा असल्याचं विधान भुजबळांनी केलं. आपण कुणालाही धमकी देत नाही, मात्र विनंती जरूर करतो, असं (I never threaten but request) म्हणत त्यांनी शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.
काय म्हणाले भुजबळ
शिवसेना आमदार सुहास कांदे पत्रकार परिषद घेऊन भुजबळांवर केलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं आहे. हा शिवसेना विरुद्ध भुजबळ असा वाद नसून शिवसेनेचे आमदार आरोप करत असल्यामुळेच त्यांचे नेते पाठिशी घालत असल्याचा दावा भुजबळांनी केला होता. बाळासाहेब ठाकरेंना अटक केल्याचा राग त्यांच्या कुटुंबीयांनादेखील नाही, मग यांनाच एवढा राग का येतो, असा सवाल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना पटलं तर ते पालकमंत्री बदलतील, असं म्हणत कुठल्याही निर्णयासाठी आपण तयार असल्याचं सुतोवाच त्यांनी केलं.
भाजप-मनसे युतीवर प्रतिक्रिया
निवडणुका आल्या की वेगवेगळे पक्ष एकमेकांशी युती करतच असतात, असं सांगत कुणाशी युती करावी, हा प्रत्येक पक्षाचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पक्षांनी काहीही केलं तरी निवडून कुणाला द्यायचं, ते जनताच ठरवेल, असंही भुजबळ म्हणाले.
काय आहे प्रकरण?
छगन भुजबळ यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत आपल्यापाशी त्याचे पुरावे असल्याचं शिवसेना आमदार सुहास कांदेंनी म्हटलं होतं. हे पुरावे मुख्यमंत्र्यांना आणि अजित पवारांना सादर केले आहेत. मी त्यांच्यासोबत कधीही चर्चेला येण्यासाठी तयार आहे. भाजीपाला विकणारे भुजबळ,25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले ? असा सवालही यावेळी सुहास कांदे यांनी उपस्थित केला होता.
हे वाचा- भाजीपाला विकणारे Bhujbal 25 वर्षांत 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? आमदार Suhas Kande यांचा सवाल
भुजबळांविरोधात न्यायालयात धाव
जबळांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आमदार सुहास कांदे यांचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुहास कांदे यांनी थेट न्यायालयातच धाव घेतली आहे.
जोरदार खडाजंगी
11 सप्टेंबर रोजी छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात एका बैठकीत जोरदार खडाजंगी झाली होती. नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा नांदगावचा अतिवृष्टी दौरा वादळी ठरला होता. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे आमदार आणि भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chagan bhujbal, NCP, Shivseana