जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अक्षय कुमारच्या OMG 2 वर सेन्सॉर बोर्डानं घातली बंदी; काय आहे नेमकं कारण?

अक्षय कुमारच्या OMG 2 वर सेन्सॉर बोर्डानं घातली बंदी; काय आहे नेमकं कारण?

OMG-2

OMG-2

OMG-2 या चित्रपटाविषयी मोठी बातमी समोर येत आहे. सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाच्या रिलीजवर सध्या बंदी घातली असल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 जुलै : अक्षय कुमारचा ‘OMG 2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीज झाला असून प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातंय. अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे.   ‘ओएमजी’ हा पहिला चित्रपट हा एक विनोदी धाटणीसोबतच, एका कट्टर नास्तिकाची कथा होती. पण आता ‘OMG 2’मधील कथा जाणून  चाहत्यांमध्ये उत्सुकता तर आहेच. पण नेटकऱ्यांनी अक्षयला हिंदू धर्माची खिल्ली न उडवण्याचा सल्ला देखील दिला. अशातच आता चित्रपटाविषयी मोठी बातमी समोर येत आहे. सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाच्या रिलीजवर सध्या बंदी घातली असल्याची माहिती समोर आली आहे. आदिपुरुष चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या दृश्य, संवाद आणि व्यक्तिरेखा यामुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या होत्या. या चित्रपटाच्या विरोधात देशभर संताप व्यक्त केला जात होता. आदिपुरुषच्या अपयशानंतर सुप्रीम कोर्टानं सेन्सॉर बोर्डला फटकारलं होतं. आता त्यानंतर सेन्सॉर बोर्ड सतर्क झालं आहे. आता सेन्सॉर बोर्डानं अक्षय कुमारच्या च्या  ‘OMG 2’ या चित्रपटाविषयी मोठा निर्णय सुनावला आहे. वृत्तानुसार, सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. सध्या हा चित्रपट रिव्ह्यू कमिटीकडे पाठवण्यात आला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

त्यामुळेच आता OMG-2 रिलीज होण्याआधी सेन्सॉर बोर्डाला अधिक सतर्कता बाळगावी लागेल. या चित्रपटाच्या बाबतीत छोटीशी चूक देखील निर्मात्यांना महागात पडू शकते. OMG-2 या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकताच  टीझर रिलीज केला. ज्यामध्ये अक्षय कुमार भगवान शंकर आणि पंकज त्रिपाठी परम शिवभक्ताच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाचा टीझर पाहून हे स्पष्ट होते की, मागील भागाप्रमाणेच यावेळीही देव आणि माणूस यांच्या नात्याभोवती एक रंजक कथा दाखवण्यात येणार आहे. सोशल मीडियावर टीझरचं कौतुक झालं. या चित्रपटाच्या टीझरमुळे चाहत्यांची तो पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. अक्षयानं नेसली ‘या’ खास व्यक्तीची 25 वर्ष जुनी साडी; नवऱ्यासोबत घेतलं जेजुरीचं दर्शन या चित्रपटात अक्षय भगवान शिवाच्या भूमिकेत दिसत आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे. शेवटच्या भागात अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. काहींनी पहिल्या भागावरही आक्षेप घेतला असला तरी हा चित्रपट सुपरहिट ठरला. आता दुसरा भाग रिलीज होण्याआधीच आलेल्या संकटानंतर निर्मात्यांचे पुढचे पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात