मुंबई, 10 जुलै : अलीकडेच रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात हिंदू देवतांना विनोदी पद्धतीने दाखवल्याबद्दल उच्च न्यायालयाने निर्मात्यांना फटकारले आहे. या चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामांच्या भूमिकेट दिसला. आता त्याच्यानंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचं नाव म्हणजे ‘OMG 2’. या चित्रपटात अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातंय. त्याच्या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज झालं होतं. पण आता चित्रपट रिलीज होण्याआधीच नेटकऱ्यांनी खिलाडी कुमारला इशारा दिला आहे. ‘OMG 2’ या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज झालं होतं. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकची झलक समोर आली होती. यामध्ये अक्षय कुमार काळ्या स्लीव्हलेस टी-शर्टमध्ये त्रिशूल, भस्म, मोठ्या जटा आणि रुद्राक्ष माळा परिधान केलेलं दिसत आहे. अक्षय कुमारला या शिवाच्या अवतारात पाहून लोकांनी सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. ‘ओएमजी’ हा पहिला चित्रपट हा एक विनोदी धाटणीसोबतच, एका कट्टर नास्तिकाची कथा होती. पण आता ‘OMG 2’मधील कथा जाणून चाहत्यांमध्ये उत्सुकता तर आहेच. पण त्याला नेटकरी इशारा देताना देखील दिसत आहेत.
अक्षयचा हाचित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तर चित्रपटाचा टीझर मंगळवारी म्हणजेच 11 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. आता अक्षयच्या या पोस्टवर लोकांनी इशाराही दिला आहे.अक्षयच्या या पोस्टवर एका युजरने सहज म्हटले आहे की, ‘हिंदू धर्माची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला गेला तर ते खपवून घेतले जाणार नाही. मागील चित्रपटात सहन केले पण यावेळी नाही, जय श्री राम.’ आणखी एका युजरने, ‘सनातन धर्माचा कुठेही अपमान झाला तर निकाल निष्पक्ष होणार नाही, लक्षात ठेवा.’ ‘सनातन आणि देवतांची चेष्टा करू नका, खिलाडी कुमार समजलं का?’ असं म्हटलं आहे. ‘माझा छळ करणारा एक सुपरस्टार…’ सलमानवर पुन्हा भडकली एक्स गर्लफ्रेंड; नाव न घेता साधला निशाणा अमित राय यांनी अक्षय कुमारच्या ‘OMG 2’ चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर अक्षय कुमार सोबत अभिनेत्री यामी गौतम, अभिनेता पंकज त्रिपाठी देखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सोबतच अनेक कलाकार आणि वेगळ्या धाटणीच्या विषयावर आधारित हा चित्रपट असेल असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता जास्तच वाढली आहे.
अक्षयच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर तो या वर्षी, तो ओह माय गॉड 2 सोबतच Sourarai Pottru च्या हिंदी रिमेकमध्ये आणि टायगर श्रॉफसोबतचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर तो ‘हेरा फेरी 3’ या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.