चेन्नई, 10 ऑक्टोबर : पैशासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका 14 वर्षांच्या मुलाने आपलं अपहरण झालं म्हणून वडिलांनाच खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल 10 लाखांची खंडणी या मुलाने मागितली होती. एखाद्या सिनेमाला शोभावी अशी घटना चेन्नई शहरात घडली आहे. 9 व्या वर्गात शिकणाऱ्या मुलाने आपल्या वडिलांकडे खूप पैसे आहे. ते आपल्याला देतील, असं गृहीत धरून आपल्याच अपहरणाचा डाव रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने वडिलांना फोन केला आणि ‘आपलं अज्ञात लोकांनी अपहरण केले आहे, त्यांनी 10 लाख रुपये मागितले आहे.’ आपल्या मुलाचे अपहरण झाल्याच्या घटनेमुळे वडिलांना मोठा धक्का बसला. मुलाचे वडिल हे दुचाकीच्या स्पेअर्स पार्ट दुकानाचे मालक आहे. त्यांनी तातडीने आपले दुकान बंद केले आणि चेन्नईतील ट्रिप्लिकेन जम बाजार पोलीस स्टेशन गाठले. खासगी कोचिंग क्लासासाठी माझा मुलगा गेला होता, त्याचे अपहरण झाले आहे, अशी तक्रार त्यांनी पोलिसांकडे नोंदवली. राकेश रोशन यांच्यावर गोळीबार प्रकरणातील कुख्यात गँगस्टरला अखेर अटक पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तातडीने सूत्र फिरवली. पोलिसांनी मुलाकडे असलेल्या फोनचे लोकशेन शोधण्याचा प्रयत्न केला असता तो चेपॉक परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मुलगा हा चेपॉक रेल्वे स्टेशनवर उभा होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि विचारपुस केली असता, त्याने आपलं अपहरण झालं होतं, असं पोलिसांना सांगितलं. पण, मुलांच्या बोलण्यावरून पोलिसांना संशय आला. त्यांनी या भागातील सीसीटीव्ही फूटेज तपासून पाहिले. यात अपहरण झालेला मुलगा आपल्या एका मित्रासोबत रिक्षातून रेल्वे स्टेशन परिसरात आला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आलेल्या रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. त्यानेही सांगितले की, ‘रिक्षा ऑनलाइन बूक करण्यात आला होता. ज्या मुलाने अपहरण झाल्याचा दावा केला होता. तो आपल्या मित्रासोबतच कोचिंग सेंटरहून चेपॉक परिसरात आला होता. त्यांनी मला 40 रुपये सुद्धा दिले.’ दरोडेखोरांची ‘मुळशी पॅटर्न’ स्टाइल वरात काढणे नागपूर पोलिसांना पडले भारी, VIDEO हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा दावा करणाऱ्या मुलाची उलट तपासणी केली असता, आपणच अपहरण केल्याचा बनाव केला होता, अशी कबुली दिली. वयाने लहान असल्यामुळे पोलिसांनी या मुलाला समज देऊन त्याच्या वडिलांकडे स्वाधीन केले. काही दिवसांपूर्वी गाझीयाबादमध्येही एका 20 वर्षीय तरुणाने 2 लाख रुपयांसाठी अपहरण केल्याचा बनाव केला होता. या तरुणाने कार घेण्यासाठी हा बनाव रचला होता. पण, या मुलाप्रमाणेच पोलिसांनी या तरुणाचा बनाव उघड पाडला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.