मनीष खरात, हिंगोली 30 जुलै : हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे मागील काही दिवसांपासून सतत वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून ती चर्चेत आली आहे. तिरुपती बालाजी इथल्या एका चेक पोस्टवर महाराष्ट्रातील वाहनांवरील छत्रपती शिवरायांचे स्टिकर आणि पुतळा काढण्यास भाग पाडलं जात असल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. यावरच आमदार संतोष बांगर यांनी आता थेट इशाराच दिला आहे. ‘..तर शिवसेनेचं नाव घेऊ नका’; राज्यपालांचा तो व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना खडसावलं आंध्र प्रदेशातील तिरूपती येथे महाराष्ट्रातील गाड्यांवर असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र तसंच स्टिकर खोडून काढले जात आहे, अशा आशयाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याविषयी एका कार्यकर्त्याने आमदार संतोष बांगर यांना फोन लावून माहिती दिली. यानंतर आमदार संतोष बांगर यांनी ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानी घातली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना यामध्ये लक्ष घालून हा प्रकार थांबवण्याची विनंती केली. त्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आंध्र प्रदेशात होणारा अवमानकारक प्रकार थांबला नाही, तर आंध्र प्रदेशातून येणाऱ्या गाड्या फोडून चुराडा करू, असा इशारा आमदार बांगर यांनी दिला आहे. त्यांच्या या कॉलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. ‘गुजराती-राजस्थानी लोकांना बाहेर काढलं तर मुंबईची ओळखच उरणार नाही’, राज्यपालांचं विधान हे प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं असून ते लवकरच याबाबत आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर तोडगा काढतील, असे बांगर यांनी म्हटलं. यासोबतच माझ्या छत्रपतींचा अवमान करणाऱ्या आंध्र प्रदेशच्या गाड्या माझ्या भागात आल्या तर मी त्या गाड्या फोडून चुराडा करून टाकेन, असा इशाराही त्यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.