जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'गुजराती-राजस्थानी लोकांना बाहेर काढलं तर मुंबईची ओळखच उरणार नाही', राज्यपालांचं विधान

'गुजराती-राजस्थानी लोकांना बाहेर काढलं तर मुंबईची ओळखच उरणार नाही', राज्यपालांचं विधान

महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती  किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही

महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही

महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जुलै : ‘महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती  किंवा राजस्थानी लोकांना काढू टाकले तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही, अस वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातला वाद अवघ्या महाराष्ट्राने अखेरच्या क्षणापर्यंत पाहिला. 12 आमदारांची नियुक्ती असो अथवा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक असो या ना त्या मुद्यावरून राज्यपाल आणि मविआमध्ये वाद पाहण्यास मिळाला. या काळात आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे राज्यपाल महोदय हे कायम चर्चेत राहिले. आता त्यांनी मुंबईबद्दल एक मोठं विधान केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत अंधेरी इथं दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण आणि उदघाटन सोहळा संपन्न झाला. या चौकाला दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचं नाव देण्यात आलं यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार नवनीत राणा आणि भाजपचे आमदार नितेश राणे सुद्धा हजर होते. ‘मी अनेक जणांना सांगत असतो, महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती लोकांना काढून टाका किंवा राजस्थानी लोकांनाही काढू टाका, जर गुजराती आणि राजस्थानी लोक सोडून गेले तर तुमच्याकडे कोणतेच पैसे उरणार नाही. मुंबईही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही, असं विधानच राज्यपालांनी केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 जणांनी आपलं हुतात्म देऊन मुंबई ही महाराष्ट्राला मिळवून दिली. मुंबईही मराठी माणसांचीच असं अभिमानाने सांगितलं जात मात्र, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे.त्यांच्या या विधानामुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात