मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

70 फूट खोल दरीत कोसळली कार, 5 ते 6 वेळा झाली पलटी पण तिघे तरुण बचावले, VIDEO

70 फूट खोल दरीत कोसळली कार, 5 ते 6 वेळा झाली पलटी पण तिघे तरुण बचावले, VIDEO

या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. ज्या ठिकाणाहून कार पलट्या खात गेली त्याठिकाणी मोठ मोठे दगडही आहेत.

या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. ज्या ठिकाणाहून कार पलट्या खात गेली त्याठिकाणी मोठ मोठे दगडही आहेत.

या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. ज्या ठिकाणाहून कार पलट्या खात गेली त्याठिकाणी मोठ मोठे दगडही आहेत.

संगमनेर, 07 मार्च : अहमदनगर (Ahmadnagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangmner) तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Nashik National Highway) माहुली घाटात (Mahuli Ghat) 60 ते 70 फूट खोल दरीत कार कोसळल्याची घटना घडली आहे. कारने पाच पलट्या खाऊनही केवळ दैव बलवत्तर असल्याने कारमधील तिघे तरूण हे बालंबाल बचावले आहे.

याबाबत माहिती अशी की, गुजरात येथील तिघे तरुण मारुती कारने देवदर्शनासाठी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाने भीमाशंकरला जात होते. रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास हे तरुण कारमधून माहुली घाटातून जात असताना चालकाला अंदाज न आल्याने कार थेट महामार्ग सोडून 60 ते 70 फूट खोल दरीत जावून कोसळली.

हा अपघात इतका भीषण होता की, दरीत कोसळल्यानंतर कार जवळपास पाच वेळा पलट्या खाऊन उलटली. आश्चर्याची बाब म्हणजे, केवळ दैव बलवत्तर असल्याने कारमधील तिघेही तरूण बालंबाल बचावले आहे. या तिन्ही तरुणांना या भीषण अपघातात कोणतीही दुखापत झाली.

Netflix पाहत विकेंड मजेत घालवा; 'या' आहेत टॉप 10 ट्रेंडीग वेबसीरिज

कार पलटी झाल्याची माहिती समजताच डोळासणे महामार्ग आणि घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हिवरगाव पावसा टोल नाक्याचे विजय पवार हेही घटनास्थळी आले होते. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. ज्या ठिकाणाहून कार पलट्या खात गेली त्याठिकाणी मोठ मोठे दगडही आहेत. केवळ नशीब चांगले असल्याने हे तिघेही तरूण अगदी थोडक्यात बचावले आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने याच ठिकाणी एक कार पलटी झाली होती. त्यानंतर पुन्हा काही दिवसांपूर्वीच याच ठिकाणी महामार्गावर मालवाहू ट्रक पलटी झाला होता.

First published:

Tags: Ahmednagar, Maharashtra, Major accident, Nashik, Pune