मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सर्व्हे बनवणारी कंपनी महाविकास आघाडीने तयार केली', रवी राणांचा नवीन शोध

सर्व्हे बनवणारी कंपनी महाविकास आघाडीने तयार केली', रवी राणांचा नवीन शोध

सी-व्होटरने इंडिया टुडेसाठी सर्व्हे केला आहे. यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला

सी-व्होटरने इंडिया टुडेसाठी सर्व्हे केला आहे. यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला

सी-व्होटरने इंडिया टुडेसाठी सर्व्हे केला आहे. यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Amravati, India

अमरावती, 29 जानेवारी : राज्याच्या राजकीय परिस्थितीवर सी-व्होटरने इंडिया टुडेसाठी एक सर्व्हे केला. पण, या सर्व्हेमुळे राजकीय वाद पेटला आहे. 'सर्व्हे करणारी सी वोटर कंपनी ही महाविकास आघाडीने तयार केलेली कंपनी आहे' असा दावाच अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला आहे.

सी-व्होटरने इंडिया टुडेसाठी सर्व्हे केला आहे. यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. यावर अमरावती जिल्ह्यातील आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली.

(अपघातातून बरे होताच धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल, बेडवरून केलं खणखणीत भाषण)

'सी वोटर कंपनी ही महाविकास आघाडीने तयार केलेली कंपनी आहे, जनतेची दिशाभूल करणारा हा सर्वे आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 45 जागा शिंदे गट व भाजपला मिळतील असा दावा आमदार रवी राणा यांनी केला.

(भाजपचे संकेत येऊनही सत्यजित तांबे का मागत नाही पाठिंबा? 'हे' तर कारण नसावं?)

तर, 'बाळासाहेबांच्या विचाराची सेना ही भाजपसोबत आहे. तसंच उद्धव ठाकरे सरकारमध्ये अडीच वर्ष महाराष्ट्रात थांबला होता. आता महाराष्ट्र धावत आहे, त्याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे, येणारा काळ हा भाजपा शिंदे गटाचा आहे अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली

..तर तिथे मी डोक्यावर भगवा व कफन बांधून तयार - नवनीत राणा

दरम्यान, तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्रावरील संकट दूर झालं पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठणाची घोषणा केली होती. मात्र मला 14 दिवस जेलमध्ये टाकलं तर तेव्हाच मी निर्णय घेतला होता जिथे जिथे हनुमान व रामाला विरोध होईल तिथे मी डोक्याला कफन व भगवा बांधून उभी राहिल, असं विधान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं. अमरावती शहरातील बुधवारा येथील हनुमान मंदिरात हजारो महिला समवेत नवनीत राणा यांनी हनुमान चालीसाचा पठण केलं यावेळी नवनीत राणा बोलत होत्या.

First published:
top videos