जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अपघातातून बरे होताच धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल, बेडवरून केलं खणखणीत भाषण

अपघातातून बरे होताच धनंजय मुंडेंचा भाजपवर हल्लाबोल, बेडवरून केलं खणखणीत भाषण

'मराठवाड्यातील सर्व निवडणूक ही महाविकास आघाडी जिंकणार आणि या दळभद्री भाजप सरकारला हाती काहीच मिळणार नाही'

'मराठवाड्यातील सर्व निवडणूक ही महाविकास आघाडी जिंकणार आणि या दळभद्री भाजप सरकारला हाती काहीच मिळणार नाही'

‘मराठवाड्यातील सर्व निवडणूक ही महाविकास आघाडी जिंकणार आणि या दळभद्री भाजप सरकारला हाती काहीच मिळणार नाही’

  • -MIN READ Bid Rural,Bid,Maharashtra
  • Last Updated :

बीड, 29 जानेवारी : येणाऱ्या काळात मराठवाड्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी जिंकणार असून दळभद्री भाजप सरकारच्या हाती काहीच मिळणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. धनंजय मुंडे अपघातातून बरे झाले आहे. पण, त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ परळी येथे आयोजित मेळाव्यात ऑनलाईन त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. (भाजपचे संकेत येऊनही सत्यजित तांबे का मागत नाही पाठिंबा? ‘हे’ तर कारण नसावं?) यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, आपल्या सर्वांच्या कृपेने मी अपघातातून बचावलो आहे. अशा पद्धतीने बेडवरून आपल्या सर्वांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधेल असे मी स्वप्नात ही पाहिले नाही’ अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलीय. (वाचा -  अमरावती पदवीधर निवडणुकीत ‘ऑडिओ बॉम्ब’ने खळबळ! आघाडीचा उमेदवार अडचणीत ) ते पुढे बोलतांना म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्षाने एक उचल्या उमेदवार उचलून आणला आहे, हे फार दुर्दैव आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला 7 पिढ्या जरी गेल्या तरी विक्रम काळे यांच्या सारखा उमेदवार मिळणार नाही. येणाऱ्या काळातील मराठवाड्यातील सर्व निवडणूक ही महाविकास आघाडी जिंकणार आणि या दळभद्री भाजप सरकारला हाती काहीच मिळणार नाही, असं मोठं विधान करत धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. दरम्यान विक्रम काळे यांना चौथ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजय मिळणार आहे, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात