मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भाजपचे संकेत येऊनही सत्यजित तांबे का मागत नाही पाठिंबा? 'हे' तर कारण नसावं?

भाजपचे संकेत येऊनही सत्यजित तांबे का मागत नाही पाठिंबा? 'हे' तर कारण नसावं?

सत्यजित तांबे भाजपचा पाठिंबा घेणार का?

सत्यजित तांबे भाजपचा पाठिंबा घेणार का?

नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना अद्याप भाजपकडून अधिकृत पाठिंबा मिळालेला नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

अहमदनगर, 28 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघातील सस्पेन्स शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहणार असल्याचं दिसत आहे. एकीकडे भाजप नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचे संकेत देत आहे. तर दुसरीकडे आम्ही भाजपकडे पाठिंबा मागितला नसल्याचं तांबे यांनी स्पष्ट केल्याने मतदारांमध्येही गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपचे प्रवक्ते, आमदार राम शिंदे यांनी सांगितले की, ‘यासंबंधी स्थानिक पातळीवर चर्चा करून नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आजच निर्णय जाहीर करणार आहेत.’ मात्र, अद्याप भाजपने अधिकृत घोषणा केली नाही.

..तर सत्यजित तांबे यांना पाठिंबा : चंद्रशेखर बावनकुळे

नाशिकमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याला माझा ना नसेल, भाजपची मत विभाजित होणार नाही ती एकालाच मिळेल. त्यामुळे भाजपची मत निर्णायक ठरतील, असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्युज 18 लोकमत सोबत बोलताना सांगितलं. त्यामुळे सत्यजित तांबे यांना भाजप पाठिंबा देईल, असे स्पष्ट संकेत आता भाजपकडून मिळाले आहेत. या संदर्भात स्थानिक नेते हे बैठक घेऊन कोणत्या अपक्षाला मतदान करायचा याचा निर्णय घेईल, आम्ही अपक्षाला मतदान करणार असा निर्णय भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून घेतला आहे. मात्र, शुभांगी पाटील यांना मतदान करणार नाही, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

वाचा - अमरावती पदवीधर निवडणुकीत 'ऑडिओ बॉम्ब'ने खळबळ! आघाडीचा उमेदवार अडचणीत

बाळासाहेब थोरांतांच्या अडचणीत वाढ?

सत्यजित तांबे हे काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांचे पुत्र आहेत. तर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. सत्यजित तांबे हेदेखील काँग्रेसचे युवा नेते म्हणून प्रसिद्ध होते. पण नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ऐनवेळी तांबे पिता-पुत्रांनी वेगळा निर्णय घेतला. महाविकास आघाडीतर्फे डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. पण डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास नकार दिला. तर सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. तांबे यांच्या या निर्णयामागे भाजपची खेळी असल्याचं म्हटलं जात होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचक वक्तव्याचाही दुजोरा दिला जात होता. मात्र, अद्यापपर्यंत भाजपने त्यांना उघडपणे पाठिंबा दिला नव्हता. जर भाजपने उघड पाठिंबा दिला तर थोरातांचीही अडचण वाढू शकते.

म्हणून तर तांबे दूर नाही?

तांबे यांनी ही निवडणूक अपक्ष लढविण्याचे ठरविले आहे. सुरवातीला ते भाजपमध्ये जाण्याची किंवा भाजप त्यांना पुरस्कृत करण्याची चर्चा होती. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे त्यांना पुरोगामी आणि काँग्रेसशी संबंधित संघटनांनी पाठिंबा दिला. काँग्रेसचा मोठा गटही त्यांच्यासोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आहे. भाजपपासून दूर राहिल्याने या संघटना त्यांच्यासोबत उघडपणे आल्या आहेत. त्या जवळ आल्याचे पाहून तांबे यांनीही भाजपकडे उघड पाठिंबा मागितला नाही, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Nashik, Satyajit tambe