चोरांनी फोडले सोन्याचे दुकान, CCTV मध्ये दिसूनही पोलीस गेले चक्रावून!

चोरांनी फोडले सोन्याचे दुकान, CCTV मध्ये दिसूनही पोलीस गेले चक्रावून!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चोरटेही जागरुक झाले असून चोरीसाठी अनेक शक्कल लढवली जात आहे.

  • Share this:

किरण मोहिते, प्रतिनिधी

फलटण, 07 जुलै : सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात चोरट्यांनी कोरोना परिस्थितीत कंटेमेंट झोन लागू असल्याचा फायदा घेत ज्वेलरीच्या दुकानात चक्क पीपीई किट घालून चोरी केली आहे. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे.वर्दळ कमी असल्याचे पाहून चोरट्यांनी ज्वेलरीचे दुकान फोडले आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चोरटेही जागरुक झाले असून चोरीसाठी अनेक शक्कल लढवली जात आहे. फलटणमधील मध्यवस्तीच्या रविवार पेठेत असलेल्या हिराचंद कांतेलाल सराफ या सोने-चांदीचे दुकानात पीपीई किट घालून तब्बल पाऊण किलो सोन्यावर डल्ला मारला आहे.

अरेरे! नदीच्या पुरात वाहत जात होता मुलगा, लोकांनी वाचवलं नाही, तयार केला VIDEO

मायक्रो कंटेन्मेंट झोनलगत असलेल्या भागात ही घटना घडली असून सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. सराफी दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी चोरी केली. भिंतीला होल मारण्यापूर्वी दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फिरवण्यात आले आणि यानंतर भिंतीला भगदाड पाडून पीपीई किट परिधान करून दुकानात शिरले.

दुकानातील दागिने अंगठ्या, चेन यासह विविध प्रकारचे सोन्याचे सुमारे 20 लाख रूपये किमतीचे 788 ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले आहे. ही घटना घडल्यानंतर फलटण शहरात मोठी खळबळ उडाली असून मुख्य बाजारपेठेतीलच दुकान फोडल्याने व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विमानतळावर ‘त्या’ बॅगमध्ये 30 किलो सोनं सापडल्याने खळबळ, थेट CMवर आरोप

या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु, चोरट्यांनी पीपीई किट घालून चोरी केल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे.

Published by: sachin Salve
First published: July 7, 2020, 5:09 PM IST

ताज्या बातम्या