अरेरे! नदीच्या पुरात वाहत जात होता मुलगा, लोकांनी वाचवलं नाही, तयार केला हा VIDEO

अरेरे! नदीच्या पुरात वाहत जात होता मुलगा, लोकांनी वाचवलं नाही, तयार केला हा VIDEO

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप वक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मच्छिमारांच्या मदतीने त्याचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे.

  • Share this:

गुना 7 जुलै: कोरोनाच्या (Corona) काळात मजुरांच्या झालेल्या हालअपेष्टांनी सगळ्या देशाला हादरवून सोडलं. त्याचं सावट अजुनही लोकांवर आहे. तर कोरोनामुळे प्रचंड निराशेचं वातावरण सगळीकडे आहे. असं वातावरण असतानाच मध्यप्रदेशातल्या (Madhya Pradesh) एका घटनेने सगळ्यांनाच हेलावून सोडलं. नदीच्या पुराच्या पाण्यात वाहत जाणाऱ्या त्या मुलाला काठावर असलेल्या लोकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला नाही तर त्याचे VIDEO तयाप केल्याची धक्कादाय आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

राज्यातल्या राजगढ जवळच्या सुठालिया इथं ही सुन्न करणारी घटना घडली आहे. इथल्या टांडी गावातला 15 वर्षांचा रामस्वरूप लोधी हा आपल्या आत्याकडे काही कामानिमित्त गेला होता. सायंकाळी घराकडे परत येत असताना त्याला नदी ओलांडून आपल्या गावी परतावं लागत होतं. पण पाऊस सुरू झाल्याने नदी ओलांडून जावं की नाही या विचारात तो होता. त्याचवेळी काही लोक नदी ओलांडून जात असल्याने रामस्वरुपनेही नदी ओलांडण्याचा निर्णय घेतला.

थोडं नदीत गेल्यानंतर अचानक पाण्याचा वेग वाढला. त्याला पुढे जाता येत नव्हतं. नदीच्या पाण्यात पुढे जाण्याएवढी शक्ती त्याच्यात नव्हती. तो त्या वेगवान पाण्यात वाहून जाऊ लागला. वाचवा वाचवा अशी त्याने हाकही दिली. मात्र लोकांनी पाण्यात उतरण्याचं धाडस केलं आणि आणि त्याला वाचविण्याचा प्रयत्नही केला नाही.

उलट सगळे लोक त्याचा VIDEO तयार करण्यात व्यस्त होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप वक्त केला जात आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर मच्छिमारांच्या मदतीने त्याचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे.

विमानतळावर ‘त्या’ बॅगमध्ये 30 किलो सोनं सापडल्याने खळबळ, थेट CMवर आरोप

सध्या देशातल्या अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे नदी-नाल्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेकदा नदीमध्ये जास्त पाणी नसलं तरी दुसऱ्या भागात पाऊस झाल्यामुळे नदीत अचानक प्रवाह वाढू शकतो. त्यामुळे नदी पार करतांना सगळ्यांनीच खूप काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 7, 2020, 4:30 PM IST

ताज्या बातम्या