विमानतळावर ‘त्या’ बॅगमध्ये 30 किलो सोनं सापडल्याने खळबळ, आरोपीचा संबंध थेट मुख्यमंत्र्यांशी?

विमानतळावर ‘त्या’ बॅगमध्ये 30 किलो सोनं सापडल्याने खळबळ, आरोपीचा संबंध थेट मुख्यमंत्र्यांशी?

आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत 15 कोटी रुपये एवढी होते. आता हे सोनं भारतात आलं कसं आणि ते कुठे जाणार होतं याचा शोध अधिकारी घेत आहेत.

  • Share this:

तिरुअनंतपूरम 7 जुलै: कोरोनेविरुद्ध लढाई सुरू असतानाच केरळमध्ये आणखी एका प्रकरणाने प्रचंड वादळ निर्माण झालं आहे. केरळ सरकारच्या (Kerla Government ) विदेशात कार्यरत असलेल्या माजी जनसंपर्क अधिकारी (PRO) असलेल्या एका महिला अधिकाऱ्याच्या बॅगेत तब्बल 30 किलो सोनं (30 KG Gold) कस्टम्स विभागाच्या तपासणीत आढळून आलं होतं. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्या अधिकाऱ्याचा संबंध थेट केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाशी (Kerla CMO )  असल्याने विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्री पिनराई विजयन  (Pinrai Vijayan) यांच्यावर आरोप केले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत 15 कोटी रुपये एवढी होते. केरळ सरकारच्या माजी जनसंपर्क अधिकारी सरित कुमार यांच्या बॅगेत हे सोनं आढळलं आहे. सरिता कुमार या UAEमध्ये कार्यरत होत्या. इथल्या विमानतळावर या प्रकरणाशी संबंधीत असल्याच्या आरोपावरून सरिता यांना सोमवारी अटक करण्यात आली होती. त्यांना 14 दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे. याच प्रकरणाशी संबंधीत स्वप्ना सुरेश या महिलेलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. स्वप्ना यांनी ही बॅग आपलीच असल्याचा दावा केला होता.

सरिता कुमार यांचा संबंध मुख्यमंत्री कार्यालयाशी संबंधीत एका IAS अधिकाऱ्यांशी असल्याचा आरोप झाला आहे. तर मुख्यमंत्री विजयन हे आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही आरोप झाले. या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित IAS अधिकाऱ्यांची तकाफडकी बदली केली आहे.

हे वाचा - पाहता पाहता नदीत बुडाली माणसांनी भरलेली बोट, थरकाप उडवणारा VIDEO

कुठल्याही भ्रष्ट माणसाला वाचविण्याचा आपण प्रयत्न करत नाही आणि या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं स्पष्टिकरण मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिलं आहे. या प्रकरणामुळे केरळच्या राजकारणात खळबळ माजली असून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आता हे सोनं भारतात आलं कसं आणि ते कुठे जाणार होतं याचा शोध अधिकारी घेत आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 7, 2020, 3:40 PM IST

ताज्या बातम्या