मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : ओमायक्रॉन महाराष्ट्रात धडकला, डोंबिवलीत आढळला पहिला रुग्ण!

BREAKING : ओमायक्रॉन महाराष्ट्रात धडकला, डोंबिवलीत आढळला पहिला रुग्ण!

दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या एक 33 वर्षीय तरुण हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे

दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या एक 33 वर्षीय तरुण हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे

दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या एक 33 वर्षीय तरुण हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे

  • Published by:  sachin Salve

डोंबिवली, 04 डिसेंबर : कोरोनाचा (corona) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) अखेर महाराष्ट्रात (maharashtra) धडकला आहे. दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये (dombivali) आलेला एक 33 वर्षीय तरुण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह (omicron positive) आढळला आहे. या तरुणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवी व्हेरिएंट आढळून आल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. कर्नाटकमध्ये दोन रुग्ण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले त्यानंतर गुजरातमध्ये एक रुग्ण आढळून आला. त्यापाठोपाठ ज्याची भिती होती तेच झाले आहे. महाराष्ट्रात पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण हा डोंबिवलीमध्ये आढळून आला आहे.

दक्षिण आफ्रिकेवरून कल्याण डोंबिवलीमध्ये आलेल्या एक 33 वर्षीय तरुण हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.  राज्यातील ही पहिली केस आहे. या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसंच, कल्याण डोंबिवलीमध्ये परदेशातून आलेले सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. नायजेरिया,रशिया आणि नेपाळ मधून केडीएमसी क्षेत्रात आलेले प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. या सहा ही जणांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले आहे.

वाईट Communication Skills मुळे येतंय अपयश? चिंता नको. या टिप्स करा फॉलो

24 नोव्हेंबर रोजी हा रुग्ण आफ्रिकेहून डोंबिवलीत आला होता,, त्याची चाचणी घेण्यात आली असता कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्या व्यक्तीसोबत असलेल्या प्रवाशाची चाचणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आणि त्याचा अहवाल सुदैवाने निगेटिव्ह आला.  यासोबतच त्याच्या तीन नातेवाईकांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती कल्याण डोंबिवली साथरोग नियंत्रण आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

धक्कादायक म्हणजे, हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहे. पण त्याचे कोरोना लसीकरण झाले नाही. असं असून सुद्धा त्याने विमानाने प्रवास केला आणि लसीकरण न झाल्याने हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे वरीष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेली ७ महिने हा तरुण कामानिमित्त अनेक देशात फिरला असून मर्चंट नेव्हीत असल्याने तो सतत समुद्रात प्रवास करत असल्याने लसीकरण झाले आहे की नाही याबाबत त्याला कधीच विचारणा झाली नाही. तसंच लसीकरण करण्यात अडचणी देखील होत्या, अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिका आरोग्य विभागाला मिळाली.

शेअर बाजारात मंदीत संधी! पडझडीदरम्यान ब्रोकरेज फर्मची 'हे' शेअर खरेदीची शिफारस

या तरुणाने केपटाऊनहुन दुबई आणि दुबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा विमानाने प्रवास केला आहे. मुंबई ते डोंबिवली तो ओला कारने आला होता.  या रुग्णाने दिल्लीत कोरोना टेस्ट केली होती. मात्र मुंबईत आल्यानंतर त्याला तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर डोंबिवलीमध्ये चाचणी केली असता ती देखील पॉझिटिव्ह आढळून आली. रुग्णाने प्रवास केलेल्या विमान आणि ओला कारची माहिती केडीएमसीने शासनाला दिली होती. रुग्णाचे 8 नातवाईकांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यामधील  सगळ्यांची  टेस्ट निगेटिव्ह आली होती.

First published: