मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेअर बाजारात मंदीत संधी! पडझडीदरम्यान ब्रोकरेज फर्मची 'हे' शेअर खरेदीची शिफारस

शेअर बाजारात मंदीत संधी! पडझडीदरम्यान ब्रोकरेज फर्मची 'हे' शेअर खरेदीची शिफारस

ब्रोकरेज हाऊस Emkay Global ने आपल्या रिपोर्टमध्ये अशा 4 शेअर्सची नावे सुचवली आहेत त्यावर एक नजर टाकूया.

ब्रोकरेज हाऊस Emkay Global ने आपल्या रिपोर्टमध्ये अशा 4 शेअर्सची नावे सुचवली आहेत त्यावर एक नजर टाकूया.

ब्रोकरेज हाऊस Emkay Global ने आपल्या रिपोर्टमध्ये अशा 4 शेअर्सची नावे सुचवली आहेत त्यावर एक नजर टाकूया.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 4 डिसेंबर : शेअर बाजार (Share MArket) ऑक्टोबरच्या उच्चांकानंतर नोव्हेंबरमध्ये 7 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. अशा परिस्थितीत, अनेक लहान-मध्यम (Small-Mid cap Share) क्वॉलिटी स्टॉक आहेत जे यावेळी स्वस्त मिळत आहेत. या शेअर्सचे फंडामेंटल आणि टेक्निकल्सही खूप मजबूत दिसत आहेत. जर आपण आता या स्टॉक्समध्ये खरेदी केली तर येत्या काही दिवसात चांगल्या कमाईची संधी आहे. ब्रोकरेज हाऊस Emkay Global ने आपल्या रिपोर्टमध्ये अशा 4 शेअर्सची नावे सुचवली आहेत त्यावर एक नजर टाकूया.

आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल (Aditya Birla Fashion And Retail)

Emkay Global, Aditya Birla Fashion And Retail (ABFRL) बद्दल खूप आशावादी आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की कंपनीची आतापर्यंतची कामगिरी त्याच्या बरोबरीच्या कंपन्यांच्या तुलनेत खूपच चांगली आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की PANTALOON सेगमेंटमध्ये कंपनीची मजबूत रिकव्हरी आणि होलसेल चॅनलमध्ये (MBO+LFS) आणखी मजबूत वाढ आश्चर्यचकित करू शकते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन एमके ग्लोबलने या स्टॉकमध्ये 340 रुपयांच्या टार्गेटसह खरेदीचा सल्ला दिला आहे.

Mutual फंडात गुंतवणूक करण्यासाठी किती रकमेची गरज असते? जाणून घ्या सर्व शंका

भारत फोर्ज (Bharat Forge)

Emkay Global भारत फोर्जवर देखील उत्साही आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की ऑटोमोटिव्ह फोर्जिंग विभागात भारत फोर्ज लीडरशीप पोजिशनमध्ये आहे. कंपनीचा फोकस डायवर्सिटिफिकेशनवर आहे. कंपनीच्या मुख्य विभागात मजबूत रिकव्हरीची अपेक्षा आहे. मध्यम कालावधीत कंपनीला डिफेन्स, रेल्वे, एरोस्पेस आणि अॅल्युमिनियम पार्ट्स चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. हे लक्षात घेऊन या शेअरमध्ये 950 च्या टार्गेटसह खरेदीचा सल्ला ब्रोकरेज फर्मने दिला आहे. शुक्रवारी हा शेअर 703 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे.

बिर्लासॉफ्ट (BirlaSoft)

Emkay Global चे Smallcap IT Stock Birlasoft वर देखील 550 चे टार्गेट आहे. Emkay Global चं म्हणणं आहे की डिसेंबर 2022 पर्यंत हे उद्दिष्ट साध्य होताना दिसत आहे. शुक्रवारी हा शेअर 483.80 रुपयांवर बंद झाला.

PF खातेधारकांना मिळणार 1 लाखांचा फायदा, कसे काढू शकता पैसे? चेक करा

सनटेक रियल्टी (Sunteck Realty)

Emkay Global ने या Smallcap Realty स्टॉकवर 740 रुपयांच्या टार्गेटसह खरेदीचा सल्ला दिला आहे. डिसेंबर 2022 पर्यंत हे टार्गेट गाठता येईल. एमके ग्लोबलचे म्हणणे आहे की कंपनी नॉन-कोअर जमीन विकण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे हा स्टॉक आणखी वाढू शकतो. एमके ग्लोबलचा विश्वास आहे की आर्थिक वर्ष 2021-2024 या कालावधीत कंपनीच्या विक्रीत वार्षिक आधारावर 27 टक्के वाढ होऊ शकते.

First published:

Tags: Investment, Money, Share market