मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: वाईट Communication Skills मुळे सतत करिअरमध्ये येतंय अपयश? चिंता नको. या टिप्स करा फॉलो

Career Tips: वाईट Communication Skills मुळे सतत करिअरमध्ये येतंय अपयश? चिंता नको. या टिप्स करा फॉलो

आज आम्ही तुम्हाला यशस्वी होण्यासाठी (how to impress someone) कम्युनिकेशन स्किल्स कसे चांगले करायचे याबाबत काही टिप्स देणार आहोत

आज आम्ही तुम्हाला यशस्वी होण्यासाठी (how to impress someone) कम्युनिकेशन स्किल्स कसे चांगले करायचे याबाबत काही टिप्स देणार आहोत

आज आम्ही तुम्हाला यशस्वी होण्यासाठी (how to impress someone) कम्युनिकेशन स्किल्स कसे चांगले करायचे याबाबत काही टिप्स देणार आहोत

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 04 डिसेंबर: कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचं म्हंटलं की तुमच्यातील काही गुण खूप महत्त्वाचे असतात. तुमचं वागणं, तुमचं दिसणं यापेक्षाही आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे तुमचं बोलणं. इतरांशी तुम्ही कोणत्या पद्धतीनं बोलता यावर तूमच्या यशाचा (career tips for interview) मार्ग अवलंबून असतो. आपल्यापेक्षा कमी पदावर असणाऱ्या व्यक्तींसोबत किंवा वरिष्ठांसोबत बोलण्याच्या पद्धतीवरून तुमचं व्यक्तिमत्व (Personality tips) कळतं. पण हे कम्युनिकेशन स्किल्सच (tips to improve communication skills) तुमच्यात नसतील तर तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागतो. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला यशस्वी होण्यासाठी (how to impress someone) कम्युनिकेशन स्किल्स (communication skills tips) कसे चांगले करायचे याबाबत काही टिप्स देणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही यशस्वी होऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया.

बॉडी लँग्वेज महत्त्वाची

तुमचे कम्युनिकेशन स्किल्स वाढवायचे असेल तर तुमची बॉडी लँग्वेज (Body language tips) योग्य ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या बॉडी लँग्वेजद्वारे तुम्ही तुमचा मुद्दा समोरच्याला सहज समजावून सांगू शकता, लोकांशी बोलताना किंवा मीटिंगमध्ये तुम्ही तुमचे हात खिशात ठेवू नयेत किंवा हात दुमडता कामा नये, तुम्ही तुमचा मुद्दा समोरच्या व्यक्तीला समजावून सांगण्यासाठी चांगल्या बॉडी लँग्वेजचा उपयोग करावा. यामुळे तुमचे कम्युनिकेशन सजिल्स चांगले राहू शकतात.

क्या बात है! आता तुमची आवड आणि छंदच ठरतील वरदान; आवड जपून करा Career

दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्या

जर तुम्हाला तुमचे कम्युनिकेशन स्किल्स सुधारायचे असेल तर तुम्हाला इतरांचे बोलणे फार काळजीपूर्वक ऐकावे लागेल. यामुळे तुम्ही त्याचे शब्द अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. सुरुवातीला तुमच्या बोलण्यात काही चुका होऊ शकतात, पण जेव्हा तुम्ही दररोज सराव करत राहाल, तेव्हा चुका कमी होतील आणि तुम्ही योग्य प्रकारे संवाद साधू शकाल. म्हणूनच काहीही नीट ऐका आणि मग बोलायला शिका.

शब्द जपून वापरा

एखाद्याशी बोलताना योग्य शब्दांचा वापर करावा. यासाठी रोज नवीन शब्द शिका आणि लोकांशी बोलताना त्यांचा वापर करा. सुरुवातीला तुम्हाला लोकांशी बोलताना तुमचा आवाज लहान ठेवा. बरेचदा असे घडते की घाईत लोक संवाद साधताना चुकीचे शब्द वापरल्या जातात, त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच शब्द जपून वापरा.

मुद्देसूद बोला

तुमचा मित्र असो किंवा इतर कोणीही, कोणाशीही बोलत असताना हे लक्षात ठेवा की तुम्हाला पॉइंट टू पॉइंट बोलायचे आहे. कुणाशी बोलायचे असेल तर न घाबरता मोकळेपणाने बोलले पाहिजे. जर तुम्ही इकडे तिकडे बोलाल तर तुम्हाला ज्या मुद्द्यावर बोलायचे आहे ते तुम्ही करू शकणार नाही. तसेच समोरच्या व्यक्तीचाही गोंधळ उडेल.

आयटी कंपन्यांमध्ये फ्रेशर्सना किती पगार मिळतो? कोणती कंपनी सर्वाधिक पगार देते?

Eye कॉन्टॅक्ट आवश्यक

लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कोणाशी बोलतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोला. यातून आपली प्रामाणिकता आणि खरेपणा दिसून येतो. तसेच आपल्या भावनाही स्पष्टपणे दिसून येतात. हे आपले कम्युनिकेशन स्किस्ल देखील प्रभावी बनवते. त्याच वेळी, असे बोलत असताना, तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो.

First published:

Tags: Career opportunities, Tips