जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BREAKING : वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या, कारला टेम्पोची धडक

BREAKING : वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या, कारला टेम्पोची धडक

BREAKING : वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या, कारला टेम्पोची धडक

सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

हिंगोली, 10 जुलै : काँग्रेसच्या (Congress) नेत्या आणि राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या कारला अपघात झाला आहे. वर्षा गायकवाड यांच्या गाडीला एका पिकअप टेम्पोने धडक दिली. सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. दैनिक लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड या 9 जुलैपासून हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. आज शनिवारी त्या नियोजित दौऱ्यानुसार जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रवाना झाल्या होत्या. शहरातील रामलिला मैदानाची पाहणी करण्यासाठी त्यांचा ताफा शहरात आला होता. Job Alert: MSRTC मध्ये ITI आणि इंजिनिअर्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी त्याच दरम्यान, दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास शहरातील पिपल्स बँकेजवळ एका पिकअप टेम्पोने त्यांच्या ताफ्याला धडक दिली. पण चालकाने प्रसंगावधान राखत कारचा वेग वाढवला त्यामुळे टेम्पो कारच्या मागील भागाला घासून गेला. सुदैवाने या अपघातात कुणालाही इजा झाली नाही. वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा ताफा काही काळ थांबला होता. त्यानंतर पुढील नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाला. या घटनेनंतर पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याला शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात