मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Job Alert: MSRTC मध्ये ITI आणि इंजिनिअर्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी; अर्जाची आज शेवटची तारीख

Job Alert: MSRTC मध्ये ITI आणि इंजिनिअर्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी; अर्जाची आज शेवटची तारीख

पात्र उमेदवार आज ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत .

पात्र उमेदवार आज ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत .

पात्र उमेदवार आज ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत .

ठाणे, 10 जुलै:  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC Recruitment 2021) ठाणे (Thane jobs) विभागातर्गत मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठीची आज शेवटची तारीख आहे. MSRTC मध्ये अ‍ॅप्रेंटीस (Apprentice), अभियांत्रिकी पदवीधर (Engineer) या पदांसाठी पदभरती होणार आहे. एकूण 105 रिक्त पदांसाठी ही पदभरती होणार आहे. पात्र उमेदवार आज ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत .

या पदांसाठी भरती

अ‍ॅप्रेंटीस (Apprentice)

अभियांत्रिकी पदवीधर (Engineer)

एकूण जागा - 105

शैक्षणिक पात्रता

अ‍ॅप्रेंटीस (Apprentice) - दहावी आणि ITI उत्तीर्ण

अभियांत्रिकी पदवीधर (Engineer) - दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची पदवी

हे वाचा - Job Alert! वर्षाअखेरीस 500 लोकांना नोकरी देणार ही Tech Company

निवड प्रक्रिया

ज्या उमेदवारांनी या पदभरतीसाठी अर्ज केला आहे अशा उमेदवारांची चाचणी होणार आहे. तसंच त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 10 जुलै 2021 असणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, St bus, Thane