पालघर, 24 जून : पालघर (palghar) जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे (earthquake) हादरे बसल्यामुळे खळबळ उडाली आहे. आज सकाळी डहाणू आणि तलासरी परिसरात एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसले आहे.
आज सकाळी डहाणू आणि तलासरी परिसरात 11 वाजून 55 मिनिटाला भूकंपाचा पहिला धक्का जाणवला आणि त्यानंतर पुन्हा चार मिनिटांनी म्हणजे 11 वाजून 59 मिनिटांनी दुसरा धक्का जाणवला. 3.7 अशी तीव्रता रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे परिसरातील घरांच्या भीतींना तडे गेले आहे. सुदैवाने अद्याप कुठेही जीवितहानीचे वृत्त नाही.
देशात डेल्टा+ व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार?, तज्ज्ञांची मोठी माहिती
गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे सत्र थांबल्याचे जाणवत होते. मात्र, आज पुन्हा हादरे बसण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नोव्हेंबर 2018 पासून जिह्यातील तलासरी, डहाणू, कासा ,चारोटी, कवाडा या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवत आहे.
Delta plus असो की दुसरा व्हेरिएंट; कोरोनाच्या प्रत्येक रूपापासून बचावाचा उपाय
या बाबत भूगर्भीय अभ्यास होत असून शासनाने या भागातील शासकीय कार्यालय, इमारती, आश्रमशाळा तसेच घरांच्या मजबुतीकरण करण्याचे निर्देश आधीच दिलेले आहेत. या धक्क्यानंतर अनेक नागरिकांनी घराबाहेर बऱ्याच काळ थांबणे पसंत केले. या भूकंपामुळे नुकसान झाल्याची माहिती अजूनही पुढे आली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.