नवी दिल्ली, 24 जून: देशात कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेनं (Second Wave) थैमान घातलं होतं. आरोग्य व्यवस्थेचा बराच बोजवारा उडालेला दिसला. आता दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस या व्हेरिएंटनं (Delta plus variant)डोकं वर काढलं आहे. या व्हेरिएंटचे देशभरात 40 रुग्ण (India on Wednesday confirmed 40 cases)आढळून आलेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्र, केरळसह इतर राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अलर्ट जारी केला आहे. त्यातच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाटेचा धोका असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. सर्वसामान्यांच्या मनात तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. यावर आता तज्ज्ञांनी दिलासादायक खुलासा केला आहे. (variant of concern )
डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरा लाट येण्याची शक्यता आहे, यासंबंधीचे अद्याप कोणतेही पुरावे नसल्याचं तज्त्रांनी म्हटलं आहे. देशातील सर्वोच्च जीनोम सिक्वेंसर याचं असं म्हणणं आहे की, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येणार असल्याचा कोणताही पुरावा नाही.
दिव्य भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार, इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (IGIB)चे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही याची काळजी आपण बाळगली पाहिजे.
देशातील बर्याच भागात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळलेत. मात्र देशातील टॉप डॉक्टर आणि जीनोम सिक्वन्सर्सनी अशी भीती निराधार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या या उत्परिवर्तित स्वरूपाचा तिसर्या लाटेशी काही संबंध नाही.
हेही वाचा- 'या' 11 देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचं थैमान, रुग्णांचा आकडा ऐकून बसेल धक्का
NDTV ने डॉ अनुराग अग्रवाल यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि भारतातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, तिसऱ्या लाटेची आतापासून काळजी करण्यापेक्षा आपण दुसऱ्या लाटेवर लक्ष द्यायला हवं. देशातील दुसरी लाट अजूनही संपलेली नाही. दुसरी लाट आता ओसरत आहे. मात्र या गंभीर परिस्थितीत निष्काळजीपणा करु नये. त्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येऊ शकते, याबाबतचे अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे सद्य परिस्थिती पाहता दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणं गरजेचं आहे.
डॉ अग्रवाल म्हणाले की, आपल्याला अजूनही सतर्क राहावं लागणार आहे. सर्व कोरोनाचे नियम पाळावे लागतील. अद्याप कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात आलेली नाही. त्यामुळे ही सर्वात मोठी चिंता देशासमोर आहे. तसंच डेल्टाचा कोणताही व्हेरिएंट भारतासाठी चिंतेचा विषय असल्याचंही ते म्हणालेत.
नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचं संकट वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या असलेला डेल्टा प्लस व्हेरिएंट डेल्टा पेक्षा धोकादायक आहे किंवा या व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येऊ शकते असं कोणतेही पुरावे नाहीत, असंही डॉ. अग्रवाल यांनी सांगितलं. इन्स्टिट्यूटनं महाराष्ट्रातून जून महिन्यात 3500 हून जास्त नमुने घेतले. जे एप्रिल आणि मे महिन्यातील आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus