मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रस्त्याच्या बाजूला आढळला कोविडशील्ड लशीचा बॉक्स, लातूरमधील घटना

रस्त्याच्या बाजूला आढळला कोविडशील्ड लशीचा बॉक्स, लातूरमधील घटना

12 ते 15 कोविडशील्ड लशीच्या बॉटल्स,  इंजेक्शन व इतर साहित्य गेल्या दोन दिवसांपासून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका मॉल समोर ठेऊन कर्मचारी निघून गेले

12 ते 15 कोविडशील्ड लशीच्या बॉटल्स, इंजेक्शन व इतर साहित्य गेल्या दोन दिवसांपासून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका मॉल समोर ठेऊन कर्मचारी निघून गेले

12 ते 15 कोविडशील्ड लशीच्या बॉटल्स, इंजेक्शन व इतर साहित्य गेल्या दोन दिवसांपासून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका मॉल समोर ठेऊन कर्मचारी निघून गेले

लातूर, 01 डिसेंबर : कोरोनाचे (corona) नवीन घातक व्हेरिएंट ओमायक्रान आढळून आल्यामुळे चिंतातूर वातावरण आहे. या नव्या संकटाला तोंड देण्यासाठी कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. पण, लातूर शहरामध्ये कोरोना लशी (corona vaccine) बॉक्ससह रस्त्यावर बेवारसपणे आढळून आल्याची धक्कादायक घडना घडली आहे.

लातूर शहरात घरोघरी जाऊन लोकांना व्हॅक्सीन देण्याची मोहीम सध्या मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. तसंच मुख्य रस्त्यांवर देखील ठिकठिकाणी व्हॅक्सिन घेण्याची सोय लातूर महानगर पालिकेनं केली आहे. मात्र लसीकरण  करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अजबच प्रकार केल्याचं समोर आला आहे.

लस ठेवण्यासाठीचा आईसबॉक्स व त्यात 12 ते 15 कोविडशील्ड लशीच्या (covishield vaccine) बॉटल्स,  इंजेक्शन व इतर साहित्य गेल्या दोन दिवसांपासून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका मॉल समोर ठेऊन कर्मचारी निघून गेले असल्याची बाब उघड झाली आहे.

HIV रुग्ण 5 वर्षांपर्यंत पत्नीसोबत ठेवत होता शरीर संबंध; अखेर असा झाला खुलासा

बेवारसपणे पडून असलेलं हे साहित्य काही तरुणांच्या निदर्शनास आल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. सुरुवातील या बॉक्समध्ये काय आहे, याची चर्चा रंगली होती. पण, जेव्हा बॉक्स उघडून पाहिला असता त्यात १० ते १५ कोविडशील्ड लस आढळून आल्या आहे. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

''आम्हाला KL Rahulला रिटेन करायचे होते, पण..पंजाब संघाच्या सहमालकाचा मोठा खुलासा

एकीकडे लशीची कमतरता असताना अशा प्रकारे लशीटाकून देणं ही बाब गंभीर असल्यानं मनपा आयुक्तांनी म्हटलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Latur