मराठी बातम्या /बातम्या /विदेश /HIV रुग्ण 5 वर्षांपर्यंत पत्नीसोबत ठेवत होता शरीर संबंध; गर्भवती झाल्यानंतर धक्कादायक खुलासा

HIV रुग्ण 5 वर्षांपर्यंत पत्नीसोबत ठेवत होता शरीर संबंध; गर्भवती झाल्यानंतर धक्कादायक खुलासा

स्वीडनमध्ये या संदर्भात हृदय रोग असणाऱ्या 1.5 लाख लोकांवर संशोधन करण्यात आलं. त्यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आलेली.

स्वीडनमध्ये या संदर्भात हृदय रोग असणाऱ्या 1.5 लाख लोकांवर संशोधन करण्यात आलं. त्यावेळी एक धक्कादायक माहिती समोर आलेली.

महिलेच्या पतीने आजार सर्वांपासून लपून ठेवला, शेवटी 5 वर्षांनंतर याचा खुलासा झाला.

फ्लोरिडा (Florida), 1 डिसेंबर : जगभरातील लोकांमध्ये एचआयवी संक्रमणाबाबत (HIV Infection) जागरुकता निर्माण करण्यासाठी 1 डिसेंबर रोजी वर्ल्ड एड्स डे (World AIDS Day) साजरा केला जातो. एड्सबाबत जागरूकता (AIDS Awareness) का आवश्यक आहे, यासंदर्भात क्लोरिडाची ही घटना महत्त्वपूर्ण ठरत आहे. येथील एका महिलेने सांगितलं की, तिच्या पतीने 5 वर्षांपर्यंत आपल्या आजाराविषयी कोणाला काहीही सांगितलं नाही. यामुळे पत्नीलाही एचआयवीची (HIV) लागण झाली. डेली मेलच्या (Daily Mail) बातमीनुसार, या व्यक्तीने स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबालाही संकटात टाकलं. यानंतर मात्र कोर्टाने त्याला 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

तो महिलांसह पुरुषांसोबतही शरीर संबंध ठेवत असे..

फ्लोरिडामधील जॅक्सनविलमध्ये राहणारी 38 वर्षीय रेनी बर्गेसने सांगितलं की, तब्बल 5 वर्षे ती त्या व्यक्तीसोबत होती, ज्याला एचआयव्हीची लागण झाली होती. जेव्हा महिला गर्भपती झाली, त्यावेळी हा खुलासा झाला. महिलेला जुळी मुलं होणार होती. यानंतर मात्र पतीने आपण एचआयव्ही बाधित असल्याचं मान्य केलं. 2002 पासून तो या आजाराशी सामना करीत आहे. त्याने लग्नादरम्यान महिलांसह पुरुषांसोबत शरीर संबंध ठेवल्याचं मान्य केलं.

कोर्टात आरोपी पतीला 5 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास..

पतीने आपल्याला धोका दिल्याचं कळताच तिने त्याला घटस्फोट दिला. कोर्टाने त्याला दोषी मानत 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. रेनीने सांगितलं की, या सर्व प्रकारामुळे तिला खूप त्रास झाला. आणि 4 महिन्यांपूर्वीच जुळ्या मुलींना जन्म दिला. सुदैवाने हे दोघेही एचआयव्ही निगेटिव्ह आहेत. रेनी बर्सेने क्लोरिडाच्या आरोग्य विभागाच्या एका मुलाखतीदरम्यान ही बाब समोर आणली.

हे ही वाचा-दिवसभर वर्गात उपस्थित राहिला पण रात्री आढळला मृतावस्थेत; शाळेतच झाला शेवट

जाणूनबुजून एचआयव्ही संक्रमित करणं हा गुन्हा आहे. सुरुवातील रेनीला याबद्दल माहिती नव्हतं. मात्र एक टीव्ही पाहताना तिला याबाबत माहिती मिळाली. यानंतर तिने कोर्टात पतीविरोधात केस दाखल केला. यानंतर त्याला 5 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला.

First published:
top videos