मुंबई, 27 डिसेंबर: तुरुंगातून बाहेर आलेल्या (Escape from prison) एका सराईत गुन्हेगाराने मुंबईतील (Mumbai) एका तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार (on record criminal raped young woman) केल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधम आरोपी काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता. तुरुंगातून बाहेर येताच त्याने पीडित तरुणीला धमकी देऊन घरी घेऊन गेला होता. याठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. तसेच घटनेच्या वाच्यता केल्यास ठार मारेल, अशी धमकीही (Threat to death) आरोपीनं पीडित मुलीला दिली होती.
पण तिने हिंमत एकवटून घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला आहे. यानंतर पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह धमकी देणे अशा कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर करता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास अंधेरी पोलीस करत आहेत.
हेही वाचा-पुणे: अल्पवयीन मुलीसोबत बापाचं विकृत कृत्य; 15दिवसांपासून सुरू होता भयावह प्रकार
पीडित तरुणी अंधेरी एमआयडीसी परिसरातील रहिवासी आहे, तर आरोपी देखील याच भागात राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीची या परिसरात प्रचंड दहशत आहे. त्याच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे परिसरातील नागरिक त्याच्याविरोधात कोणतीही तक्रार करत नाहीत. शिवाय त्याने केलेला अन्याय निमूटपणे सहन करतात. अलीकडेच त्याला एका वेगळ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर पुन्हा तुरुंगातून सुटून बाहेर आला होता.
हेही वाचा-संशयी पत्नीचं विकृत कृत्य; पतीला गावातील अल्पवयीन मुलीवर करायला लावला बलात्कार
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, नराधम आरोपीनं पीडित तरुणीचा पाठलाग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिला आपल्या घरी आणून तिच्यावर बलात्कार केला आहे. तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारेल अशी धमकी देखील आरोपीनं दिली आहे. या प्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Rape