मराठी बातम्या /बातम्या /देश /

Exclusive Video: पियूष जैनचं कोट्यवधींचं घबाड, घराच्या या कोपऱ्यात लपवला होता खजिना

Exclusive Video: पियूष जैनचं कोट्यवधींचं घबाड, घराच्या या कोपऱ्यात लपवला होता खजिना

आयकर विभागाच्या (Income Tax Department)  जाळ्यात अडकलेल्या पियूष जैनच्या (Piyush Jain) वडिलोपार्जित घराचा व्हिडिओ समोर आला आहे.

आयकर विभागाच्या (Income Tax Department) जाळ्यात अडकलेल्या पियूष जैनच्या (Piyush Jain) वडिलोपार्जित घराचा व्हिडिओ समोर आला आहे.

आयकर विभागाच्या (Income Tax Department) जाळ्यात अडकलेल्या पियूष जैनच्या (Piyush Jain) वडिलोपार्जित घराचा व्हिडिओ समोर आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare

उत्तर प्रदेश, 28 डिसेंबर: आयकर विभागाच्या (Income Tax Department) जाळ्यात अडकलेल्या पियूष जैनच्या (Piyush Jain) वडिलोपार्जित घराचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तळघर दाखवण्यात आले आहे. ज्यामध्ये पियूष जैन यांनी कोट्यवधींच्या रोकडसह सोने-चांदी कथितपणे लपविले होते. यासोबतच या तळघरातून अनेक महत्त्वाची कागदपत्रेही आयकर विभागाला सापडली आहेत. नंतर भिंत तोडून तळघरात जाण्याचा मार्ग सापडला. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केल्याचे सूत्रांकडून समजतंय.

पियूष जैन याच्या घरात DGGI आणि आयकर विभागाकडून (Income Tax) टाकण्यात आलेल्या छाप्यात (Raid) अशा जागी लपवून ठेवलेली करोडोंची संपत्ती (Crores of rupees) सापडली आहे, ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल.

लहान कॉरिडॉर आणि नंतर तीन खोल्या

तळघरात जाण्याचा मार्ग बेडरूममधील बेडच्या जवळ होता आणि तिथून आत गेल्यावर एका मोठ्या हॉलमध्ये एक अरुंद कॉरिडॉर उघडला. या हॉलमधून दोन खोल्या जोडण्यात आल्या होत्या. या दोन्ही खोल्यांमधून आयकर विभागाला पियूष जैनचा खजिना मिळाला आहे. तळघराचा संपूर्ण मजलाही प्राप्तिकर विभागाने जमीनदोस्त केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळघरात रोख रकमेसह अनेक महत्त्वाची कागदपत्रेही लपवण्यात आली होती.

" isDesktop="true" id="649556" >

जीएसटी इंटेलिजन्सने केलेल्या कारवाईत कानपूरचे व्यापारी पियूष जैन (Piyush Jain) यांच्या घरातून 257 कोटी रुपये रोख आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.

अंडरग्राउंड टाकीत लपवली रक्कम

कन्नौजमधील प्रसिद्ध अत्तर व्यापारी पियूष जैन याच्या फॅक्टरीवर ही धाड टाकण्यात आली. धाड टाकून तपास करत असताना पोलिसांना एक अंडरग्राउंड टाकी सिल करून ठेवल्याचं दिसलं. पोलिसांनी ती टाकी फोडून आतमध्ये पाहिलं असता तिथं त्यांना कोट्यवधी रुपये लपवून ठेवल्याचं आढळलं. या टाकीतून अधिकाऱ्यांनी 17 कोटी कॅश आणि 23 किलो सोनं बाहेर काढलं. या सोन्यावर आंतरराष्ट्रीय मार्कदेखील असल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर मेडिकल करून पियुष जैनला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कोण आहे पियूष जैन?

पियुष जैन हा एक अत्तर व्यावसायिक असून उत्तर प्रदेशातील बडं प्रस्थ आहे. एकूण 40 कंपन्यांचा तो मालक असून त्यापैकी दोन कंपन्या मिडल इस्टमध्ये आहेत. कन्नौजमध्ये जैन याच्या नावे कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंपदेखील आहेत. त्याच्या कंपनीचं अत्तर परदेशात एक्सपोर्ट होतं. पियूषचं मुंबईतही एक अलिशान घर असल्याची माहिती आहे.

बेडमध्ये भरले होते पैसे

DGGI आणि आयकर विभागाचं हे धाडसत्र जवळपास 36 तास सुरु होतं. या धाडीदरम्यान जवळपास 180 कोटी रुपयांची रोख रक्कम अधिकाऱ्यांना सापडली आहे. भिंती, कपाटं यासोबत बेडमध्येही नोटा भरून ठेवण्यात आल्या होत्या.

पियूषने दिली कबुली

पियुषने दिलेल्या कबुलीनुसार जीएसटी न भरता केलेल्या व्यवहारांशी संबंधित ही कॅश आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: Uttar pradesh news