सोलापूर 31 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिपस्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जायचं आणि तब्बल 11 वेळा आमदार राहिलेले सांगोला तालुक्यातील ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (Ganapatrao Deshmukh) यांचं निधन झालं आहे. ते 94 वर्षांचे होते. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे पार्थिव अश्विनी रुग्णालयातून पहाटे 5:30 वाजता पेनूरकडे मार्गस्थ झालं. सध्या त्यांचं पार्थिव जन्मभूमी पेनूर येथे दाखल झालं असून काही काळ अंत्यदर्शनासाठी पार्थिव पेनूरमध्ये ठेवलं जाणार आहे. सांगोला ते विधानसभा, एसटी बसनेच प्रवास; असे होते आमदार गणपराव देशमुख! 8 वाजता हे पार्थिव त्यांची कर्मभूमी सांगोल्याकडे रवाना होणार आहे. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान गणपतराव देशमुख यांनी अखेरचा श्वास घेतला (Ganapatrao Deshmukh Passed Away). त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अश्विनी रुग्णालयात मागील 15 जुलैपासून उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
VIDEO: गणपतराव देशमुख यांचं पार्थिव पेनूरमधून सांगोल्याकडे रवाना pic.twitter.com/PWvEHrtCCC
— News18Lokmat (@News18lokmat) July 31, 2021
असा आमदार होणे नाही! ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन 1962 साली गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द बहरू लागली. पहिली निवडणूक लढवताना दुष्काळी सांगोल्यातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी त्यांनी लढाई सुरू केली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. सर्वाधिक म्हणजेच तब्बल 11 वेळा एकाच पक्षाकडून निवडणूक जिंकणारे विक्रमवीर आमदार अशी गणपतराव देशमुख यांची ओळख आहे.