रत्नागिरी, 31 ऑक्टोबर : रत्नागिरी (Ratnagiri ) जिल्ह्यातील जयगड (jaygad) इथं मासेमारी करणारी नावेद-2 ही बोट तब्बल 6 खलाशांसह बेपत्ता आहे. या दुर्घटनेतील एका खलाशाचा मृतदेह शोधण्यात यश आले असून अजूनही दोन जणांचे मृतदेह बेपत्ता आहे. खोल समुद्रात प्रशासनाच्या तीन स्पीड बोटी,कोस्टगार्डची एक स्पीड बोट व काही खाजगी बोटी यांच्याकडून युद्धपातळीवर ‘सर्च ऑपरेशन’ हाती घेण्यात आले आहे. 26 ऑक्टोबर मंगळवारी सायंकाळी उशीरा जयगड मधून मासेमारी साठी समुद्रात गेली होती. तब्बल पाच दिवसानंतर अद्याप बेपत्ता आहे. सदर नौका किनाऱ्यावर आलेली नाही व कोणत्याही प्रकारे संपर्क होत नसल्याने मालक संसारे यांनी जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिली आहे. या बोटीवर सहा खलाशी होते. त्यांचा शोध सुरू आहे. पाच दिवसांच्या शोधमोहिमेनंतर एका जणांचा मृतदेह हाती लागला आहे. चाळीशी उलटूनही सुटेना मुलाची हौस, अपत्यप्राप्तीसाठी सुरूय तिसऱ्या लग्नाची तयारी सहा सिलेंडरची ही बोट आहे. या बोटिवर दगडू तांडेल नामक मुख्य चालक असून गोविंद नाटेकर, दत्ता, सूर्या, अनिल, अमोल या नावाचे चार खलाशी बोटीवर आहेत. हे सगळे गुहागर तालुक्यातील खलाशी आहेत. पोलीस, बंदर अधिकारी, मेरीटाईम बोर्ड आदी सागरी सुरक्षा यंत्रणा समन्वय ठेऊन असून शोधकार्य सुरू आहे. विकृतीपणाचा कळस, तरुणाने केला भटक्या कुत्रीवर अत्याचार! दरम्यान, रात्री उशीरा एक मृतदेह हाती लागला असून आज आणखी एक मृतदेह हाती लागला आहे. इतर दोन जणांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.