मराठी बातम्या /बातम्या /देश /

चाळीशी उलटूनही सुटेना मुलाची हौस, अपत्यप्राप्तीसाठी सुरूय तिसऱ्या लग्नाची तयारी

चाळीशी उलटूनही सुटेना मुलाची हौस, अपत्यप्राप्तीसाठी सुरूय तिसऱ्या लग्नाची तयारी

लग्नाला 7 वर्षं उलटूनदेखील मूल होत नसल्याने पत्नीपासून घटस्फोट हवा असल्याची मागणी (Husband seeks divorce as wife unable to deliver baby) पतीनं कोर्टात केली आहे.

    ग्वालियर, 31 ऑक्टोबर: लग्नाला 7 वर्षं उलटूनदेखील मूल होत नसल्याने पत्नीपासून घटस्फोट हवा असल्याची मागणी (Husband seeks divorce as wife unable to deliver baby) पतीनं कोर्टात केली आहे. मूल व्हावं यासाठी अनेक प्रयत्न करूनही आपली पत्नी आपल्याला मूल देऊ शकली नाही, असा दावा करत तिला (Divorce for no baby) घटस्फोट देणार असल्याचं पतीनं जाहीर केलं आहे. तर पत्नी मात्र (Wife denies divroce) घटस्फोटासाठी तयार नसून पतीसोबतच राहणार असल्याचा चंग तिने बांधला आहे. मुलासाठी केलं दुसरं लग्न मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये राहणाऱ्या 41 वर्षांच्या या व्यक्तीचं हे दुसरं लग्न आहे. 2009 साली त्यानं पहिलं लग्न केलं होतं. लग्नानंतर चार वर्ष होऊनही पत्नीला मूल होत नव्हतं. त्यामुळं वैतागून त्याने तिला घटस्फोट दिला. दोन वर्षं प्रतीक्षा करून त्यानं पुन्हा दुसरं लग्न केलं आणि मुलाच्या तयारीला लागला. मात्र दुसऱ्या लग्नालाही 7 वर्षं उलटली आणि तहीही काही पाळणा हलेना. त्यामुळे ही व्यक्ती पुन्हा संतापली आणि दुसऱ्या पत्नीलाही घटस्फोट देण्याची तयारी तिने केली. पत्नीच्या आजाराचं निमित्त पत्नीची तब्येत बिघडल्यानंतर पतीने तिला माहेरी आणून सोडलं. मात्र त्यानंतर तिला परत घ्यायला तो आलाच नाही. सासरच्यांनी याबाबत विचारणा केली असता आपल्याला आता पत्नीची गरज नसल्याचं सांगत घटस्फोटासाठीचा अर्ज पाठवून दिला. मात्र पत्नीने या घटस्फोटाला तयारी नसल्याचं कोर्टात सांगितलं आहे. आपल्याला आपल्या पतीसोबतच राहण्याची इच्छा असून घटस्फोटाला आपण तयार नसल्याचं तिनं म्हटलं आहे. कोर्टानं दिला सल्ला कोर्टानं सध्या दोघांनाही समुपदेशन घेण्याचा सल्ला दिला असून परस्पर सहमतीनं तोडगा काढण्याची सूचना केली आहे. मात्र केवळ मुलाला जन्म देण्याच्या निकषावरून पत्नीला घटस्फोट देण्याची भाषा करणाऱ्या या पतीबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Court, Divorce, Wife and husband

    पुढील बातम्या