जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पेण बाजार समितीसाठी भाजपचा नवा डाव; निवडणुकीत शेकापला धोबीपछाड देणार?

पेण बाजार समितीसाठी भाजपचा नवा डाव; निवडणुकीत शेकापला धोबीपछाड देणार?

पेण कृषी उत्पन्न बाजार समिती

पेण कृषी उत्पन्न बाजार समिती

पेण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी एकूण 54 अर्ज दाखल झाले आहेत.

  • -MIN READ Pen,Raigad,Maharashtra
  • Last Updated :

पेण, 4 एप्रिल : पेण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून पेण कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापची एक  हाती सत्ता आहे. मात्र यंदा चित्र काहीसं वेगळ पहायला मिळण्याची शक्यता आहे. पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी एक महिन्यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी यंदा भाजप आपली पूर्ण ताकद पणाला लावणार असल्यानं, पेणमध्ये शेकापच्या गडाला सुरुंग लागणार का? हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे. शेवटच्या दिवशी 54 अर्ज  पेण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी एकूण 54 अर्ज दाखल झाले आहेत.  या 18 जागांसाठी सहकार सोसायटी 32 ग्रामपंचायत 13, व्यापारी व अडते 6,  हमाल माथाडी 3 असे एकूण 54 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष काळे यांनी दिली. भाजप, शिंदे गटाचे ‘ते’ 3 नेते अडचणीत? राऊतांच्या नव्या ट्विटने खळबळ  लढतीमध्ये चूरस   गेल्या अनेक वर्षांपासून पेण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेकापची एक  हाती सत्ता आहे. मात्र यंदा ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. गेल्याच महिन्यात माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ही निवडणूक धैर्यशील पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. तर दुसरीकडे शेकाप देखील पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी पूर्ण ताकतीनं मैदानात उतरण्याची शक्यता आहे.  त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात