औरंगाबादेत भाजप कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडले

औरंगाबादेत भाजप कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडले

पोलिसांनी विक्रेते आंदोलक आणि भाजप पदाधिकारी संजय केनेकर यांच्यासह 50 ते 60 जणांना ताब्यात घेतले.

  • Share this:

सचिन जिरे,प्रतिनिधी

औरंगाबाद, 10 जानेवारी : औरंगाबाद (Aurangabad) शहरात मोहोटा देवी मंदिराजवळील भाजी मंडईच्या स्थलांतराच्या विरोधात सुरू असलेल्या विक्रेत्यांचा आंदोलनात भाजपने (BJP) समर्थन दर्शवत रात्रभर ठिय्या देत पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स तोडले आणि रस्त्यावर टायर जाळून जोरदार घोषणाबाजी केली होती.  पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह सुमारे 50 ते 60 आंदोलकांना ताब्यात घेतले.

सुमारे 25 वर्षांपूर्वी बजाजनगरात असलेल्या भुखंडावर भाजी मंडई भरत आहे. मात्र, प्रशासनाने ही मंडई इतरत्र हलविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या स्थलांतराला विक्रेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनस्थळी राज्यमंत्री अब्दुल सत्तर यांनी भेट देत आंदोलक विक्रेत्यांशी चर्चा केली होती.

राज्यमंत्री सत्तर माघारी जाताच काही स्थानिक भाजप पदाधिकारी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ठिय्या दिला होता. त्यानंतर रात्री भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर यांनी विक्रेत्यांशी संवाद साधला व विक्रेत्यांच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. पोलिसांनी या परिसरात बॅरिकेट्स लावले होते. त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर लावलेले पोलिसांचे बॅरिकेट्स तोडले व जाळपोळ केली.

गणेश नाईकांची राजकीय खेळी, शिवबंधन तोडून नगरसेविकेची 'घरवापसी'!

या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी पोलिसांचा मोठा फौजफाटा मंडई परिसरात आज सकाळपासूनच तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकारी देखील या प्रकरणात लक्ष घालून होते.

VIDEO: 'अरे रे अरे ये क्या हुआ' गाण्यावर अंकितानं दिले एक्सप्रेशन, चाहते घायाळ

प्रशासनाने विक्रेत्यांना जागा खाली करण्याबाबत सूचना केल्या होत्या. तरी देखील आज सकाळपर्यंत विक्रेते तेथेच ठिय्या देत असल्याने सकाळी  एमआयडीसी पोलिसांनी विक्रेते आंदोलक आणि भाजप पदाधिकारी संजय केनेकर यांच्यासह 50 ते 60 जणांना ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे परिसरात काही तणाव निर्माण झाला आहे.

Published by: sachin Salve
First published: February 10, 2021, 2:45 PM IST

ताज्या बातम्या