मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /गणेश नाईकांची राजकीय खेळी, शिवबंधन तोडून नगरसेविकेची 'घरवापसी'!

गणेश नाईकांची राजकीय खेळी, शिवबंधन तोडून नगरसेविकेची 'घरवापसी'!

भाजप नगरसेवकांनी अलीकडच्या काळात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे नाईक यांच्या गडाला मोठा हादरा बसला होता.

भाजप नगरसेवकांनी अलीकडच्या काळात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे नाईक यांच्या गडाला मोठा हादरा बसला होता.

भाजप नगरसेवकांनी अलीकडच्या काळात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे नाईक यांच्या गडाला मोठा हादरा बसला होता.

नवी मुंबई, 10 फेब्रुवारी : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (navi mumbai mumbai corporation election) तोंडावर भाजपला गळती लागली आहे. पण आता शिवसेनेत (Shivsena) दाखल झालेल्या भाजप (BJP) नगरसेविकेची घरवापसी झाली आहे. शिवसेनेला रामराम ठोकून नगरसेविका सुरेखा नरबागे पुन्हा एकदा भाजपमध्ये दाखल झााल्या आहे.

नवी मुंबई महापालिकेत भाजपला गेल्या काही दिवसांपासून चांगलीच मोठी गळती लागली होती. भाजपचे नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. पण आता शिवसेनेत गेलेल्या नगरसेविका सुरेखा नरबागे पुन्हा भाजपमध्ये दाखल झाल्या आहे.

RSS मधील मोठ्या पदावरील नेत्याला 3 हल्लेखोरांनी घातल्या गोळ्या; परिसरात तणाव

मागील वर्षी मार्च महिन्यात महाविकास आघाडीच्या संसाराला सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी भाजपचा हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजपच्या कविता आगोंडे यांच्यासोबत सुरेखा नरबागे यांनी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याकडे राजीनामा सोपवत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. पण, आता नरबागे यांनी शिवबंधन तोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सरकारी रट्ट्यानंतर Twitter नरमलं, ‘त्या’ अकाऊंटवर कारवाई सुरू

भाजपमधून इतर पक्षात गेलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपात येण्यास इच्छुक आहे, असा दावा भाजप आमदार गणेश नाईकांनी केला आहे. अनेक नगरसेवकांनी अलीकडच्या काळात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे नाईक यांच्या गडाला मोठा हादरा बसला होता. पण, आता नाईक यांनी नवी खेळी करत गेलेल्या नगरसेवकांना परत आणण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

First published:

Tags: BJP, Ganesh naik, Maharashtra, Mumbai, Pm narenda modi, Shivsena, गणेश नाईक, भाजप