Home /News /career /

Indian Oil Recruitment: इंडियन ऑइलमध्ये जुनिअर इंजिनिअर्सच्या तब्बल 513 जागांसाठी भरती; 1.05 लाख रुपये मिळणार पगार

Indian Oil Recruitment: इंडियन ऑइलमध्ये जुनिअर इंजिनिअर्सच्या तब्बल 513 जागांसाठी भरती; 1.05 लाख रुपये मिळणार पगार

संपूर्ण देशभरातील रिफायनरीजमध्ये ही भरती होणार आहे.

  नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर:  इंडियन ऑइलमध्ये (Indian Oil Recruitment 2021) लवकरच काही पदांसाठी पदभरती होणार आहे. संपूर्ण देशभरातील रिफायनरीजमध्ये ही भरती होणार आहे.  यासाठीची अधिसूचना (IOCL recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट या पदांच्या विविध जागांसाठी ही भरती (Indian Oil recruitment for junior Engineers) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर  2021 असणार आहे. या पदांसाठी भरती जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Production) जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (P&U) जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Electrical) जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Mechanical) जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Instrumentation) जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Fire & Safety) जुईनीअर क्वालिटी कंट्रोल अनॅलिस्ट (Junior Quality Control Analyst - IV) जुनिअर मटेरियल असिस्टंट (Junior Material Assistant) IOCL recruitment 2021
  IOCL recruitment 2021
  हे वाचा -  BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 'या' पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी शैक्षणिक पात्रता  आणि अनुभव जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Production) - 50% गुणांसह पेट्रोलियम किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आणि एक वर्षाचा अनुभव. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (P&U) - 50% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक. फिटरचा अनुभव आवश्यक. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Electrical) - 50% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आणि एक वर्षाचा अनुभव. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Mechanical) - 50% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आणि एक वर्षाचा अनुभव. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Instrumentation) - 50% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आणि एक वर्षाचा अनुभव. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Fire & Safety) - फिज़िक्स, केमेस्ट्री मध्ये B.Sc आवश्यक आणि एक वर्षाचा अनुभव. जुईनीअर क्वालिटी कंट्रोल अनॅलिस्ट (Junior Quality Control Analyst - IV) - इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा इंस्ट्रुमेंटेशनमध्ये डिप्लोमा आवश्यक. जुनिअर मटेरियल असिस्टंट (Junior Material Assistant)  -  B.Sc. (Nursing) किंवा तीन वर्षांचा नर्सिंगचा कोर्स आवश्यक. (अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघावी) वयोमर्यादा 30 सप्टेंबर 2021 रोजी सामान्य उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे आणि कमाल वय 26 वर्षे असेल. सरकारी नियमांनुसार सूट दिली जाईल. इतका मिळणार पगार या आपदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 25,000/- ते 1,05,000/- रुपये प्रतिमहिना इतका पगार देण्यात येणार आहे. या शहरांमध्ये होणार भरती IOCL ची रिफायनरीज आणि पेट्रोकेमिकल युनिट्स गुवाहाटी, डिगबोई, बोंगाईगाव (आसाम), बरौनी (बिहार), वडोदरा (गुजरात), हल्दिया (पश्चिम बंगाल), मथुरा (उत्तर प्रदेश), पानीपत (हरियाणा) आणि पारादीप (ओडिशा). अशा पद्धतीनं करा अप्लाय सुरुवातीला www.iocl.com या इंडियन ऑईलचा ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्या. यानंतर ‘What’s New’ वर क्लिक करा. यानंतर “ Requirement of Experienced Non-Executive Personnel 2021 in IOCL, Refineries Division' या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला जाहिरात दिसेल या जाहिरातीवर क्लिक करा. “Click here to Apply Online” वर क्लिक करा आणि आपली संपूर्ण माहिती आणि तपशील भरा. हे वाचा - SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! या 2056 पदांवर होणार भरती; कसा कराल अर्ज? अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर  2021
  JOB TITLE IOCL recruitment 2021
  या पदांसाठी भरती जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Production) जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (P&U) जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Electrical) जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Mechanical) जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Instrumentation) जुनिअर इंजिनिअर असिस्टंट - IV (Fire & Safety) जुईनीअर क्वालिटी कंट्रोल अनॅलिस्ट (Junior Quality Control Analyst - IV) जुनिअर मटेरियल असिस्टंट (Junior Material Assistant)
  शैक्षणिक पात्रता  आणि अनुभव 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आणि एक वर्षाचा अनुभव.
  वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल वय 26 वर्षे
  इतका मिळणार पगार 25,000/- ते 1,05,000/- रुपये प्रतिमहिना
  या शहरांमध्ये होणार भरती गुवाहाटी, डिगबोई, बोंगाईगाव (आसाम), बरौनी (बिहार), वडोदरा (गुजरात), हल्दिया (पश्चिम बंगाल), मथुरा (उत्तर प्रदेश), पानीपत (हरियाणा) आणि पारादीप (ओडिशा).
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://iocl.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs

  पुढील बातम्या