मुंबई, 20 मे : कर्नाटक विभानसभा निवणुकांमध्ये मोठा पराभव झाल्याने भाजप सावध झाली आहे. आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी भाजपकडून पुन्हा एकदा हिंदुत्वाचे कार्ड खेळण्यात येणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेत्यांना आक्रमक होण्याचे आदेश भाजपच्या राज्यातील नेत्यांना केंद्रीय नेतृत्वाने दिले आहेत. ‘मोदी सरकारचे काम आणि हिंदूत्वाचे नाव’ असा अजेंडा आता भाजप राबवणार आहे. आगामी निवडणुकीसाठी हिंदुत्वाचे कार्ड आगामी निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. तसेच मोदी सरकरला देशात सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. या नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजप मोदी @9 हे अभियान राबवणार आहे. महाराष्ट्रात या अभियानासाठी 11 जणांची समिती नेमली असून देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकार्यावर विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याचसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेत्यांना आक्रमक होण्याचे आदेश केंद्रीय नेतृत्वाने दिले आहेत.
भाजप हिंदूंच्या बाजूने असल्याचे लोकांना पटवून द्या, विकास कामांसह हिंदुत्त्वाचा मुद्दाही रेटा, असा सल्ला पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार नितेश राणे, आमदार राम कदम, आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘मोदी सरकारचे काम आणि हिंदूत्वाचे नाव’ असा अजेंडा भाजप आता राबवणार आहे. या पार्श्वभूमीवर हिंदूंचे सण व इतर कार्यक्रम धूम धडाक्यात साजरे करणार आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350 वर्षपूर्ती निमित्त राज्यभर कार्यक्रमांची आखणी करण्यात येणार आहे.
नवमतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न येत्या निवडणुकीत भाजप नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते. पत्रकार आदींशी संपर्क सांधण्यास सांगितले आहे. भाजपचे आमदार, खासदार यांना कामगार, महिला, युवकांशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुंबई दौऱ्यात युवकांशी संवाद साधला. भाजपच्या वतीनं युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तुम्ही परिस्थितीनुसार स्वत:ला बदलायला हवं. आणि तुम्ही स्वत:ला बदललं नाहीत तर सध्याच्या शर्यतीत तुम्ही मागे राहाल, असा सल्ला नड्डांनी तरुणांना दिला.

)







