मुंबई, 11 मे : कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांवर लवकरात लवकर उपचार होऊ ते बरे व्हावेत यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. पण यानंतर आता राज्य सरकारसमोर एक नवं संकट आ वासून उभं राहिलं आहे. कोरोनातून बचावल्यानंतर म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) हे गंभीर फंगल इन्फेक्शन (Fungal infection) होत आहे. यामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. अशी कबुली पहिल्यांदाच राज्य सरकारने दिली आहे.
कोरोनानंतर आता राज्यात म्युकोरमायकोसिसने चिंता वाढवली आहे. राज्यात या आजाराचे 2 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Maharashtra Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.
Mucormycosis patients will be treated for free under Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana. Over 2,000 cases have been reported & 8 people have died of this infection in the state so far. We are making special wards for these patients: Maharashtra Health Minister Rajesh Tope pic.twitter.com/XnAT9loG5F
— ANI (@ANI) May 11, 2021
तीन दिवसांपूर्वीच राज्यात म्युकोरमायकोसिसमुळे 8 कोरोनामुक्त रुग्णांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण त्यावेळी सरकारने या वृत्ताचं खंडन केलं होतं. या रुग्णांचे डोळे काढण्यात आल्याचं सांगितलं होतं. राज्याचे वैद्यकीय संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ही माहिती दिली होती. पण आता तीन दिवसांनी खुद्द आरोग्यमंत्र्यांनी राज्यात म्युकोरमायकोसिसमुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र हादरला आहे.
हे वाचा - जन्मताच होती त्याची कोरोनाशी लढाई, 11 दिवसांनी नवजात बाळानं COVID-19 वर केली मात
दरम्यान राज्यात म्युकोरमायकोसिसवर मोफत उपचार करणार असल्याची घोषणाही आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (mahatma jyotiba phule jan arogya yojana) यावर उपचार केले जाणार आहेत. तसंच या रुग्णांसाठी विशेष वॉर्डही तयार केले जाणार आहेत.
हे वाचा - Maharashtra Lockdown लॉकडाऊनमध्ये अटी शिथील होणार का? राजेश टोपे म्हणाले...
राजेश टोपे यांनी सांगितलं, "म्युकोरमायकोसिस या आजारावर उपचार करण्यासाठी लागणारं अॅम्फोतेरसीन (Amphotericin) हे औषध अत्यंत महागडं आहे. पूर्वी या इंजेक्शची किंमत दोन ते अडीच हजार होती ती मागणी वाढल्यानं आता सहा हजारांवर गेली. सात दिवस दोन वेळा म्हणजे चौदा इंजेक्शनचा डोस याचा घ्यावा लागतो. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्याला ते अनेकदा परवडणार नाही. त्यामुळं या औषधाच्या किमतींवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Rajesh tope