मराठी बातम्या /बातम्या /देश /

भयंकर! गंगेत वाहताना आढळले 40-45 मृतदेह; कोरोना बळींची विल्हेवाट लावल्याचा संशय

भयंकर! गंगेत वाहताना आढळले 40-45 मृतदेह; कोरोना बळींची विल्हेवाट लावल्याचा संशय

बिहारमध्ये स्थानिकांना सकाळी एक धक्कादायक दृश्य दिसलं. गंगेच्या किनाऱ्यावरून पाण्यात तरंगणारे किमान 40-45 मृतदेह दिसत होते. उत्तर प्रदेशातून ते वाहात आल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे.

पाटणा, 10 मे :  बिहारच्या बक्सर जिल्ह्यात आज सकाळी स्थानिकांना एक धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं. गंगेच्या किनाऱ्यावरून पाण्यात तरंगणारे मृतदेह दिसत होते. किमान 40-45 मृतदेह वाहात आलेले पाहिल्याचं स्थानिक सांगतात. स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे की, हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहात आले आहेत. ते कोरोना रुग्णांचे मृतदेह असल्याची शंकाही व्यक्त करण्यात आल्याने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मृतदेह दफन करण्यासाठी जागा नसल्याने त्यांना तसंच नदीत सोडून देण्यात आलं असावं असं काही अधिकारी नाव जाहीर न करता सांगत आहेत. त्यामुळे हे प्रकरण तापण्याची चिन्हं आहेत.

भारतात विशेषतः उत्तर भारतात कोरोना बळींची संख्या प्रत्यक्षाहून अधिक असण्याची शंका नेहमीच वर्तवण्यात येते. या पद्धतीच्या दृश्याने आणि बातम्यांंमुळे त्याला बळ मिळत आहे.

News18 हिंदीने दिलेल्या बातमीनुसार, स्थानिक अधिकारी अशोक कुमार यांनी बिहारच्या चौसा जिल्ह्यात महादेव घाटावर किमान 40 मृतदेह तरंगत असत्याचं सांगितलं. मृतदेह नदीत फेकून दिल्यासारखे वाटतात. ते फुगलेल्या आणि अर्धवट सडलेल्या अवस्थेत असल्याचं ते सांगतात. किमान चार-पाच दिवस ते पाण्यात असावेत. म्हणूनच उत्तर प्रदेशातून ते वाहात आले असावेत, असा अंदाज ते वर्तवतात.

रुग्णालयाला कोरोनाने ग्रासलं; 80 जणांना संसर्ग, वरिष्ठ डॉक्टरचा मृत्यू

आणखी एक अधिकारी केके उपाध्याय यांच्या म्हणण्यानुसार, हे मृतदेह उत्तर प्रदेशातूनच वाहात आलेले दिसतात. नदीतून अशा पद्धतीने संसर्ग पसरत असल्याचं पाहून हाहाकार उडाला आहे. या मृतदेहांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी 500 रुपये दिले जात असल्याचीही माहिती हिंदी वेबसाइटने दिली आहे.

First published:

Tags: Bihar, Coronavirus, Ganga river, Uttar pradesh