साताऱ्यात पहिल्यांदाच भाजपचा भगवा फडकणार? राष्ट्रवादीच्या गडाला खिंडार

साताऱ्यात पहिल्यांदाच भाजपचा भगवा फडकणार? राष्ट्रवादीच्या गडाला खिंडार

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेंनीही भाजपचा रस्ता धरला. या सगळ्या नेत्यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच महागात पडू शकतो.

  • Share this:

किरण मोहिते

सातारा, 16 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपने साताऱ्याचे एकेक मोहरे आपल्या तंबूत घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पडून इथे पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकणार असल्याची चिन्हं आहेत. याआधीच्या दोन निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यातली एकही जागा भाजपला मिळाली नव्हती. आता मात्र समीकरणं बदलली आहेत.

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे या दोघांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. माणचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरेंनीही भाजपचा रस्ता धरला. या सगळ्या नेत्यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच महागात पडू शकतो.राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात यावेळी 4 आमदार निवडून आणण्याचा निर्धार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

शिवेंद्रराजे भोसलेंचा भाजप प्रवेश

सातारा जावळी मतदारसंघात राष्ट्रवादीतून भाजपत आलेले शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळे इच्छुक असलेले भाजपचे नेते दीपक पवार यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांना पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचं अध्यक्षपद देऊन राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे शिवेंद्रराजे भोसले मागच्या दोन निवडणुकांमध्ये निवडून आले. त्यामुळे आता त्यांच्याकडेच या मतदारसंघाची उमेदवारी दिली जाईल, अशी चिन्हं आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे अजुन 70 आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक - महाजन

वाईच्या जागेकडे लक्ष

वाई - महाबळेश्वर- खंडाळा मतदारसंघात माजी आमदार मदन भोसले इच्छुक आहेत. मुख्यमंत्र्यांनीही इथून मदन भोसलेंना उमेदवारी दिली जाणार, असं जाहीर केलं.  सध्या इथे राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आमदार आहेत. इथे मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले अशी लढत होऊ शकते.

माणची जागा कुणाला ?

माणमध्ये जयकुमार गोरे भाजपमध्ये गेल्यामुळे इथली समीकरणं बदलली आहेत. पण त्याचवेळी त्यांचे भाऊ शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता हा मतदारसंघ जागावाटपात कुणाकडे जातो यावरून इथली उमेदवारी ठरेल.

केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात, कधीही होऊ शकते विधानसभेची घोषणा!

पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे नेते अतुल भोसले अशी लढत असेल. मागच्या निवडणुकीत इथे अटीतटीची लढत झाली आणि पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले. आता पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपची लढत होण्याची चिन्हं आहेत.

कराड उत्तर मध्ये भाजपकडून मनोज घोरपडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील अशी लढत होऊ शकते. तर कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपचे महेश शिंदे अशी लढत होईल.

फलटणच्या राखीव मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण विरुद्ध शिवसेनेचे दिगंबर आगवणे अशी लढत होईल. पाटणमध्ये विक्रमसिंह पाटणकर विरुद्ध शंभूराजे देसाई अशा लढतीची चिन्हं आहेत.

==================================================================================

VIDEO: उद्धव आणि फडणवीसांमध्ये चढाओढ, कोण रचणार राम मंदिराची पहिली वीट?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 16, 2019 08:33 PM IST

ताज्या बातम्या