प्रशांत बाग, नाशिक 16 सप्टेंबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक आजी-माजी आमदार आणि खासदारांनी भाजप शिवसेनेत प्रवेश केल्याने राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. या सर्व प्रवेशांमध्ये मोठी भूमिका निभावलीय ती भाजपचे संकटमोचक आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू गिरीश महाजन यांनी. महाजन यांनीच आता यावर महत्त्वाचं विधान केलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे किमान 70 आमदार अजुनही भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत असं महाजन यांनी स्पष्ट केलं. महाजनांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय चर्चेला तोंड फुटणार आहे. प्रवेशासाठी आता मोठं कोणी राहिलं नाही. दोन्ही महाराज भाजपमध्ये आलेत, त्यांच्यापेक्षा कोणी मोठं आहे का? असा सवालही त्यांनी केला. ठाण्यातले खड्डे कसे गोल गोल! भाजप शिवसेनेत रस्त्यांवरून जुंपली महाजन म्हणाले, तिकिटासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. आम्ही सर्व्हेनुसार अंतीम निर्णय घेतो. पवार आमच्या अंत:करणात असं म्हणणाऱ्यांनाही महाजन यांनी टोला लगावला. पवारांना अंत:करणात ठेवा आणि भाजपमध्ये या असं ते म्हणाले. महाजन पुढे म्हणाले, 15 ते 20 जागांची अदलाबदल होऊ शकते. आम्ही कधीही निष्ठवंतांना डावलणार नाही. आता जास्त लोकं आले तर त्यांनाही तिकीट देणं शक्य नाही मग का घ्यायचं? राज ठाकरे यांची ‘ही’ भूमिका शरद पवारांना मान्य नाही! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजनादेश यात्रेचा 19 तारखेला समारोप होणार आहे. त्यावेळी होणाऱ्या सभेची माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोदावरी आरती होणार ही अफवा आहे. असं कोणतंही नियोजन नाही. युतीची यादी चर्चेनंतर फायनल होणार आहे. आमची 288 जागांवर तयारी आहे. आमची तयारी शिवसेनेसाठीही काम करणार आहे. अनधिकृत होर्डिंग्ज वर कारवाई करण्याच्या पालिका आयुक्तांना सूचना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. असे होर्डींग्ज भाजपचे असतील तरी कारवाई करा असं सांगतल्याचंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.