मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्य सरकार खाटेवरून आता तिरडीवर येईल, भाजप खासदाराची जळजळीत टीका

राज्य सरकार खाटेवरून आता तिरडीवर येईल, भाजप खासदाराची जळजळीत टीका

 'कोरोनाच्या परिस्थितीत महाराष्ट्र सरकार हे सर्वात अपयशी ठरले आहे. योग्य प्रकारे नियोजन करता आले नाही'

'कोरोनाच्या परिस्थितीत महाराष्ट्र सरकार हे सर्वात अपयशी ठरले आहे. योग्य प्रकारे नियोजन करता आले नाही'

'कोरोनाच्या परिस्थितीत महाराष्ट्र सरकार हे सर्वात अपयशी ठरले आहे. योग्य प्रकारे नियोजन करता आले नाही'

पंढरपूर, 16 जून :सरकार कोविड 19 बाबत उपाययोजना करण्यासाठी अपयशी ठरल आहे. सरकार आता खाटेवर आल्याच जर सामना दैनिकास वाटत असेल तर ते ताठीवर जायला आता तीन चार महिने पुरे आहेत, अशी जळजळीत टीका भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. शिवसेनेनं काँग्रेसवर टीका केल्यामुळे भाजपच्या हाती आयते कोलीत लागले आहे. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट महाविकास आघाडी सरकार किती दिवस टिकेल याचं भाकितच वर्तवलं आहे. हेही वाचा - 30 लाख फोन कॉल्स, भारतीय लष्काराच्या माहितीसाठी चिनी कंपन्यांची मदत 'महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस वाढली आहे. त्यामुळे सरकार हे आता खाटेवर आलं आहे. बहुतेक सरकार चालवण्याचा लोड तिन्ही पक्षांना झापत नाही, असं आता दिसून येत आहे. त्यामुळे तिन्ही पक्षात प्रचंड कुरबुरी वाढल्या आहे. त्यामुळे या कुरबुरीतून डाव मोडायचा असं चित्र आज सामनाच्या लेखातून दिसून आलं आहे', अशी टीका निंबाळकर यांनी केली. तसंच, 'कोरोनाच्या परिस्थितीत महाराष्ट्र सरकार हे सर्वात अपयशी ठरले आहे. योग्य प्रकारे नियोजन करता आले नाही. अलीकडे कोरोनाबाधित मृत रुग्णांचे आकडे लपवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हे अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून सरकारचा  आटोपण्याचा डाव आहे', निंबाळकर यांनी केला. सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलं? 'काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते व सत्ता कोणाला नको असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. ' हेही वाचा -कोरोनाच्या परिस्थितीत 'या' सवयी बदला; नाहीतर पडतील महागात बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर ही कुरबुर अधिक प्रकाशझोतात आली आहे. 'सरकारमध्ये जरा आमचेही ऐका! रशासनातील अधिकारी म्हणजे नोकरशाही वाद निर्माण करीत आहे. आम्ही काय ते मुख्यमंत्र्यांशीच बोलू!' असं अशोक चव्हाण यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Congress, काँग्रेस, सामना

पुढील बातम्या